शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आयुष्यातून नैराश्याचा आजार हद्दपार कसा कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:10 IST

लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेका नैराश्याचा आजार होतो.

डॉ. विद्याधर बापट मानसोपचारतज्ज्ञ

जागतिक आरोग्य संघटनेने २०२० पर्यंत डिप्रेशनचा आजार तीव्र स्वरूप धारण करेल आणि दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार ठरेल, असं भाकीत केलं होतं. सध्याचं चित्र तसंच असल्याचं जाणवत आहे. लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेका नैराश्याचा आजार होतो.

कधीतरी मूड जाणं, अपसेट वाटणं किंवा एकाकी वाटणं हा प्रकार सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतो; परंतु एकाकीपणा किंवा दुःखी मनःस्थिती सगळ्या आयुष्याचाच ताबा घेत असेल, दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असतील आणि हे चक्र बराच काळ चालले असेल तर आपण डिप्रेशनच्या आजाराचे बळी असू शखतो. तीव्रता, काल आणि लक्षणानुसार डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. या विषयाची व्याप्ती मोठी आहे, पण ओळख करून घेण्यासाठी मुख्य मुद्द्यांना स्पर्श करू.

नैराश्याची लक्षणे

अतिशय निराश आणि असहाय असल्याची भावना, एकाकीपणा वाटणे

दैनंदिन जीवनातील रस कमी होणे /संपणे, कशातच आनंद न वाटणे 

लैंगिक इच्छा कमी होणे/ नाहीशी होणे 

भूक कमी होणे, अचानक वजन कमी होणे

निद्रानाश, झोप कमी होणे किंवा जास्त झोपणे

आजारास कारण ठरणारे घटक 

तीव्र आर्थिक संकट, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वांतून निर्माण होणारा ताण. 

आनुवंशिकता 'स्व'प्रतिमा क्षीण व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन. 

गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी (उदा. कर्करोग, हृदयरोग, एचआयव्हीमुळे निर्माण होणारा ताण.) 

लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग किंवा झालेला आघात.

इतर गंभीर मानसिक आजारांबरोबर नैराश्याचा आजार असू शकतो.

आजारावर उपचार

१. योग्य आणि संतुलित आहार घ्या. २. डिप्रेशन जर्नल लिहा, ज्यायोगे भावनांना वाट मिळेल. ३. रोज एरोबिक्ससारखा चलपद्धतीचा भरपूर व्यायाम करा. त्याने शरीरात सेरोटिनीन, एण्डोर्फिन्स आणि नैसर्गिक अॅण्टीडिप्रेझंट्स स्त्रवतील. ४. योगासने आणि प्राणायाम करा. रोज संगीत ऐका. ५. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. ६. मनात उमटणारे नैराश्याचे विचार, भीती म्हणजे वास्तव नव्हे, याचे भान ठेवा. ७. सोपी, सहज साध्य होतील, अशी ध्येये ठेवा आणि ती साध्य करण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स