शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिन्ह गेलं..! नावही गेलं..!! आता पुढे काय..?; नेते हो, डोकं भंजाळून गेलंय

By अतुल कुलकर्णी | Updated: February 19, 2023 06:26 IST

आता पुढे काय होणार..? शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह दोन्ही शिंदे गटाकडे गेलं. आता उद्धव ठाकरे नवा पक्ष काढणार का..? नवी घटना लिहिणार का..?

नेते हो, नमस्कार.महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय..? कोण कोणत्या पक्षात..? कोण कोणत्या नेत्यासोबत..? आणि कोण कोणत्या विचारांसोबत..? काहीही कळायला मार्ग नाही. शिवसेनाएकनाथ शिंदे यांच्याकडे... धनुष्यबाणही त्यांच्याच हाती... मग उद्धव ठाकरे यांच्या हातात काय..? त्यांचा पक्ष कोणता..? 

आता पुढे काय होणार..? शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह दोन्ही शिंदे गटाकडे गेलं. आता उद्धव ठाकरे नवा पक्ष काढणार का..? नवी घटना लिहिणार का..? निवडणुकीला सामोरं जायचं तर पक्षाचं नाव लागेल. पक्षाला चिन्ह लागेल. बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाची पूजा केली, जी मशाल उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात लोकांच्या मनात पेटवली. ते धनुष्यही जवळ नाही...पेटवलेली मशाल हाती राहील की नाही, माहिती नाही... त्यामुळे आता नेमकं होणार तरी काय..? नाक्या-नाक्यावर चर्चा सुरू आहेत. गटागटांनी लोक निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेत जाऊन न्यायनिवाडा करत आहेत. नेते हो, तुम्हीच काय ते खरं सांगा...

ज्या जनतेने आपापल्या मतदारसंघातून खासदार, आमदार निवडून दिले. त्यांनी नेमका कोणावर विश्वास टाकला होता..? उमेदवारावर की बाळासाहेब ठाकरेंवर..? की भाजप-शिवसेनेवर..? की विकासावर..? शुक्रवारी जो निर्णय आला त्यामुळे नेमका विजय कोणाचा झाला..? शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा..? की ज्या जनतेने या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांचा..? एकदा निवडून दिलं की पाच वर्ष नेत्यांनी कसंही वागावं. कोणासोबतही संसार थाटावा. कोणासोबतही काडीमोड घ्यावा. इतकी मोकळीक तुम्हाला दिली ते चूक की बरोबर..? नेते हो, डोकं भंजाळून गेलं आहे.

आता जर का निवडणुका झाल्या तर कोणाकडे बघून लोकांनी मतदान करायचं..? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की ४० आमदार आणि १३ खासदारांकडे..? नेमकं शिवसैनिकांनी बघायचं कोणाकडे..? तुम्हाला एकदा निवडून दिलं की तुम्ही कधी एकत्र येता..? कधी भांडता..? आणि पुन्हा कधी एकत्र येता..? ते सामान्य माणसाला काही कळत नाही. मात्र गावागावात, एकाच घरात दोन भावांमध्ये जी भांडणं लागली आहेत, जे वाद पेटले आहेत, ते कोण, कसे मिटवणार..?  या सगळ्यांमध्ये जोरदार तर्कवितर्क सुरू आहेत. पहिला म्हणतो, ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळता आली नाही...’ दुसरा म्हणतो, ‘भाजपच्या बड्या नेत्यांनी शिवसेना फोडली...’ तर तिसरा विचारतो, ‘शिवसेना अशी फोडण्याइतपत परिस्थिती आणली कोणी...? तुम्हाला तुमचा पक्ष नीट सांभाळता आला असता, तर तो आज असा फुटला असता का..?’

उद्धव ठाकरे म्हणतात, ‘शिवसेनेचं नाव चोरलं... धनुष्य चोरलं...’ तर शिंदे गटाचे नेते म्हणतात, ‘मुंबईत मनसेचे सात नगरसेवक चोरून नेले होते की, गिफ्टमध्ये मिळाले होते..?’ निवडणूक आयोग म्हणतो, ‘संघटनात्मक पातळीवर शिवसेनेत फूट पडली आहे. म्हणून शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं.’ सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट म्हणतो, ‘शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडलेली नाही.’ तर कायदा सांगतो, संघटनात्मक पातळीवर आणि विधिमंडळात उभी फूट पडली तरच पक्ष फुटला असं म्हणता येतं. या सगळ्यात शिंदे गटाचा दावा मान्य केला आणि फूट पडली नाही असं गृहीत धरलं, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला व्हिप शिंदे गटाला लागू होतो. तो लागू झाला तर १६ आमदार अपात्र होतात. मग ज्या शिंदे गटाला शिवसेना आणि चिन्ह मिळालं, ते सत्तेत कसे राहू शकतील..? असा तर्क तज्ज्ञ मंडळी देऊ लागली आहेत.

नेते हो काय खरं, काय खोटं तुम्हालाच माहिती...नेते हो, जर १६ आमदार निलंबित झाले, तर सरकार बरखास्त होईल. मग राष्ट्रवादीकडून अजित पवार पुढाकार घेतील का..? सरकारमध्ये सहभागी होतील का..? की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल..? तसे झाले तर लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहील. आज जो आनंद आणि आक्रोश दोन्ही बाजूनं दिसत आहे, तो तोपर्यंत टिकेल का..? ४० आमदारांचे काय होणार..? ते कोणाच्या तिकिटावर उभे राहणार..? प्रश्न अनेक आहेत. वेळ मिळाला तर याचे उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्या...

जाता जाता : आता शिवसेनेच्या शाखा कोणाकडे जाणार..? शिवसेनेचे ट्विटर हँडल कोण चालविणार..? एकमेकांना गाडण्याची भाषा सुरू झाली आहे. कोण कोणाला गाडणार..? कोण कोणाला तारणार..? तुम्हाला काय वाटतं..? एका ज्योतिषाने सांगितलं आहे की, जून-जुलै महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार... तुम्ही पण एखाद्या ज्योतिषाला विचारून घ्या... काळजी घ्या...- तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना