शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

लेख: हल्ली तुम्ही गुगल कमी वापरायला लागला आहात ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:35 IST

माहिती मिळवण्यासाठी आपण किती वेळा ‘गुगल’ करतो? त्याऐवजी चॅटबॉटचा वापर आता वाढला आहे; पण त्याचे गुण-दोषही समजून घ्यायला हवेत.

साधना शंकरलेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारीआजकाल आपण किती वेळा गुगलवर जातो आणि काही सर्च करतो? किती माहिती आपण गुगलवरून मिळवतो? गुगलचा तुमचा वापर आधीसारखाच आहे की, आता तुम्ही चॅट जीपीटी, ग्रोक किंवा मेटाला गुगलपेक्षा अधिक प्राधान्य देता? संवादात्मक एआय, जे आता सतत अधिक चांगले होत आहे आणि इंटरनेटवरील जुनी, मूलभूत पद्धत ढवळून काढत आहे. लोक ऑनलाइन माहिती आता कशी शोधतात? जनरेटिव्ह एआयचा उदय आणि वापरकर्त्यांचे वर्तन यामुळे माहिती शोधण्याची पद्धत आता मुळातून बदलते आहे आणि याचा परिणाम संपूर्ण डिजिटल विश्वात जाणवतो आहे.

पूर्वी आपल्याला जी माहिती हवी असायची त्यासाठी आपण ‘गुगल’ करत होतो आणि त्यानंतर मिळालेल्या लिंक्सवर क्लिक करून आपल्याला हवी ती माहिती मिळवत होतो. आता कोणत्याही एआय चॅट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाइप करा आणि ते तुम्हाला विश्लेषणासहित, संकलित तयार उत्तर देते. त्यासाठी इतर कुठेही जाण्याची गरज नाही. वापरकर्त्यासाठी हे खूप सोपे आहे, पण याचा अर्थ असा की, ‘एआय’ला माहिती पुरवणाऱ्या विविध साइट्सवर येणारी वाहतूक (ट्रॅफिक) त्यामुळे कमी होते. गमावलेले वाचक म्हणजे गमावलेले उत्पन्न! नेमका वापर मोजणे अवघड आहे, पण विविध अहवालांनुसार सर्च इंजिन्सवरील मासिक ट्रॅफिक १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्यावर्षी गुगलने आपल्या परिणामांमध्ये एआय-निर्मित सारांश जोडायला सुरुवात केली आणि ‘Let Google do the Googling for you’ अशी घोषणा केली. ही घट संपूर्ण इंटरनेटवर जाणवते आहे. वृत्त प्रकाशक आणि कंटेंट निर्माते यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. 

एआय मॉडेल्सना अनेकदा त्यांच्या कंटेंट संदर्भात प्रशिक्षण दिले जाते. पण त्यांच्या उत्तरांमध्ये ते लिंक्स किंवा श्रेय, स्रोत देत नाहीत, परिणामी त्या त्या वेबसाइटवरील ट्रॅफिक आणि त्यांचा महसूल कमी होतो. त्यामुळे काही वृत्तसंस्था आणि कंटेंट प्लॅटफॉर्म्सनी आधीच प्रतिकार करण्यास सुरुवात केली आहे. एआय कंपन्यांसोबत त्यांनी परवाना करार केले आहेत किंवा त्यांचा डेटा संरक्षित करण्यासाठी ‘पेवॉल्स’ (सदस्यत्व शुल्क) लावायला सुरुवात केली आहे. ही समस्या व्यापक आहे. यामुळे संदर्भ साइट्सची ट्रॅफिक जवळपास १५ तर हेल्थ साइट्सची ट्रॅफिक ३१ टक्क्यांनी घटली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, ट्रॅव्हल ॲग्रिगेटर्स आणि रिव्ह्यू साइट्सची चिंता त्यामुळे वाढली आहे. उदाहरणार्थ, दिलेल्या बजेटमध्ये फ्लाइट्स आणि निवासासह सुट्टीची योजना ‘एआय’ला विचारून मी एकच सर्वंकष उत्तर मिळवू शकतो, तर मग मी बुकिंग किंवा ट्रॅव्हल साइट्सवर कशाला जाईन?

ज्या वेबसाइट्सवर लोक जाहिरातींद्वारे कमाई करत होते, त्यावर क्लिक करणे हाच इंटरनेट चालवण्याचा मार्ग होता, ती प्रणाली आता संकटात आहे. भविष्यातील इंटरनेट आजच्या इंटरनेटपेक्षा खूप वेगळे असू शकते. विविध वेबसाइट्सनी आपला डेटा आता ‘पेवॉल्स’मागे सुरक्षित ठेवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे इंटरनेटवरील (फुकट) माहितीचा स्रोत कमी होत आहे. कंटेंट निर्माते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ई-मेल्स, सोशल मीडिया आणि वैयक्तिक संपर्क यांचा वापर करू लागले आहेत. अनेक खटले सुरू आहेत. परंतु, लहान साइट्सही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, ज्यांच्याकडे या आघाडीवर लढण्याची क्षमता नाही.

‘एआय’चे वापरकर्ते म्हणून आपल्याला फक्त ‘एआय’च्या उत्तरांवर अवलंबून राहण्याचे धोके लक्षात ठेवले पाहिजेत. ‘एआय’ची उत्तरे अनेकदा चुकीची, पक्षपाती आणि चुकीची असू शकतात, हे सर्वज्ञात आहे. एआय अनेकदा माहितीचा स्रोत देत नाही आणि पारंपरिक वेबसाइट्सप्रमाणे दिलेल्या माहितीची ‘मालकी’ आणि जबाबदारी ते घेत नाहीत. आपण ‘एआय’ला विचारलेले प्रश्न कसे संग्रहित केले जातात किंवा वापरले जातात हे अजूनही अज्ञात आहे. ज्यामुळे गोपनीयतेबद्दल चिंता निर्माण होते. पारंपरिक इंटरनेट रूपांतरित होत असताना, त्याऐवजी काय येणार हे संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचे आहे. जर खुल्या इंटरनेटचा अविश्वसनीय स्रोत हळूहळू नाहीसा झाला, तर सगळ्यांसाठी ती एक मोठी शोकांतिका असेल.

टॅग्स :googleगुगलSocial Mediaसोशल मीडिया