शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लेख: माहितीच्या अतिरेकाबाबत सावध! नाकातोंडात ‘इन्फर्मेशन’ जाऊन महापुरात बुडाला असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 08:56 IST

माहितीच्या अतिरेकाबाबत सजग राहणे गरजेचे आहे. अनावश्यक माहितीकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावा. चालणे, धावणे, सूर्यप्रकाश या अनुभवांचा आनंद घ्या!

साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

आपले आयुष्य आज अनेक प्रकारे ऑनलाइन झाले आहे. बातम्या आज आपल्यापर्यंत कशा पोहोचतात? आपण खरेदी कशी करतो? उपचार कसे घेतो? संवाद कसा साधतो?.. यातल्या बहुतांश गोष्टी आता आपण ऑनलाइन करतो. एआयने आपल्याला आभासी जगात अडकवले आहे, कारण आपण आपले आयुष्य आणि काम अधिक सोपे करण्यासाठी त्यावर अवलंबून आहोत. या ऑनलाइन जगात आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा मारा होतो की आपल्या मेंदूला अजून त्याची सवय झालेली नाही.

काही अहवालांनुसार, २०२५ मध्ये जागतिक स्तरावर तयार केलेली, साठवलेली, कॉपी केलेली आणि वापरलेली माहिती एकूण १८१ झेटाबाइट्स होती. (एक झेटाबाइट म्हणजे एक ट्रिलियन गिगाबाइट्स) दररोज ४०२.७४ दशलक्ष टेराबाइट्स इतकी माहिती निर्माण होत असून, ती पुढेही वाढत राहण्याची अपेक्षा आहे! माहितीचा हा अतिरेक आपल्या आयुष्यात गोंधळ निर्माण करत आहे. ‘माहितीचा अतिरेक’ हा शब्दप्रयोग १९६४ मध्ये अमेरिकेतील हंटर कॉलेजचे प्रा. बर्ट्रम ग्रॉस यांनी पहिल्यांदा केला. ही समस्या नवीन नाही. सन १४५० मध्ये जर्मन मुद्रक जोहान्स गुटेनबर्ग यांनी मुद्रण तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यापासून ही समस्या सुरू झाली. त्यामुळे मुद्रित साहित्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर कार्बन पेपर, सायक्लोस्टाइलिंग आणि फोटोकॉपिंग- माहितीची पुनरुत्पत्ती करणे सोपे होत गेले तसे माहितीचा अतिरेक वाढत गेला. बटण दाबताच प्रकाशन शक्य करणाऱ्या माहितीच्या डिजिटायझेशनने या समस्येला आणखी एका वेगळ्या पातळीवर नेले आहे.

आज, ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो एका ‘हायपर कनेक्टेड’ जगात राहतो. फोनमधील ॲप्स तसेच फिटनेस, आरोग्य, आर्थिक स्थिती, सूर्यप्रकाशाचा संपर्क किंवा झोपेची गुणवत्ता मोजणारी वेअरेबल उपकरणे वापरकर्त्यांसाठी सातत्यानं डेटा तयार करत असतात. या उपकरणांमधून मिळणारा डेटा अनेकदा वापरकर्त्यांना नीट समजत नाही किंवा तो योग्य प्रकारे वाचला जात नाही, अथवा तो संदर्भहीन असू शकतो. जर तुम्ही फिनटेक ॲप वापरत असाल आणि बाजारातील हालचाली तुम्हाला योग्य प्रकारे समजल्या नाहीत, तर तुमच्या उपकरणातून येणारा डेटा अनावश्यक उच्च पातळीची चिंता निर्माण करू शकतो.

सोशल मीडियावरही माहिती आणि डेटा सतत प्रवाहित होत असतो. बातम्या, मते आणि माहिती आपल्या जीवनात ओसंडून वाहत आहेत. आपण अनेकदा विचार न करता ती माहिती घेतो. तसेच या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे वेळ किंवा इच्छा नसते. यामुळे गोंधळ आणि तणाव निर्माण होतो. सतत अपडेट राहण्याची आणि प्रत्येक संदेश व पोस्ट पाहण्याची इच्छा आपल्यामध्ये थकवा, झोपेत व्यत्यय आणि चिंता निर्माण करते. असंख्य ॲप्स, उपकरणे आणि पर्यायांच्या गर्दीत लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे.

कामाच्या ठिकाणीही माहितीच्या अतिरेकाचे नकारात्मक परिणाम होतात. लोकांना वेगवेगळ्या ई-मेल आणि यूजर अकाउंट्समध्ये प्रवेश करावा लागतो, वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. हायब्रिड कामाची पद्धत सामान्य होत असल्याने तणाव अधिक वाढतो. मग यावर उपाय काय? विविध व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून डेटा अत्यंत वैयक्तिक स्वरूपात सादर करत आहेत, ज्यामुळे वैयक्तिक गरजेनुसार (कस्टमाइज्ड) आणि अर्थपूर्ण माहिती मिळते. उदाहरणार्थ, आहारासंदर्भातील ॲप्स केवळ कॅलरी मोजण्याऐवजी आपण काय खातो याची जागरूक नोंद ठेवण्यास प्रोत्साहन देत आहेत. वैयक्तिक स्तरावर, आपल्या जीवनातील माहितीच्या अतिरेकाबाबत आपण सजग राहणे आवश्यक आहे. आपल्या ॲप्समधील पुश नोटिफिकेशन्स बंद करा, सोशल मीडियासाठी वेळ ठरवून वापरा आणि एका वेळी एकाच उपकरणावर किंवा प्लॅटफॉर्मवर राहण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक माहितीकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावा. प्रत्येक गोष्ट मोजण्याचा प्रयत्न करू नका.. आपण किती चाललो, किती धावलो, किती सूर्यप्रकाश घेतला.. -या ॲक्टिव्हिटीजचा परिणाम मोजण्याऐवजी त्यांचा आनंद घ्या !

sadhna99@hotmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Beware Information Overload: Drowning in a Sea of Data?

Web Summary : Digital overload overwhelms our brains. Constant updates, social media, and devices create stress. Customize data, limit notifications, and enjoy activities without constant tracking. Be mindful of information consumption for well-being.
टॅग्स :onlineऑनलाइनArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स