शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

ही जगण्याची कला ? छे...अप्पलपोटेपणा

By गजानन जानभोर | Updated: November 21, 2017 00:13 IST

माणसाने कसे जगावे? हे सांगण्यासाठी कुणी पैसे घेत असेल तर त्याला आपण संत, श्री श्री, महाराज म्हणावे का? खचितच नाही.

माणसाने कसे जगावे? हे सांगण्यासाठी कुणी पैसे घेत असेल तर त्याला आपण संत, श्री श्री, महाराज म्हणावे का? खचितच नाही. संत गाडगेबाबांनी मानवधर्माची दशसूत्री सांगून ठेवली आहे. त्यानुसार, अशी माणसे बाजारू असतात. आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी परवा नागपुरात वातानुकूलित सभागृहात धनवंतांसोबत केलेली ‘अंतरंग वार्ता’ अशीच धंदेवाईक होती. या वार्तेसाठी अडीच हजारापासून पंचेवीस हजारापर्यंत तिकीट होते. रविशंकरांनी अशा प्रवचनांचे पैसे घ्यावे की नाही? हा तसा त्यांचा खासगी प्रश्न. पण जर तुम्ही स्वत:ला संत म्हणवून घेत असाल, लाखो माणसांची तुमच्यावर श्रद्धा असेल तर पैसे घेऊन जगण्याची कला शिकविणे हा बाजारुपणा नव्हे का? मग या रविशंकरांना समाजाने संत, गुरुजी का म्हणावे? अशावेळी गाडगेबाबा प्रकर्षाने आठवतात...गाडगेबाबा गावातील एखादे वर्दळीचे ठिकाण निवडायचे, ती जागा स्वत: झाडायचे आणि जमलेल्या ग्रामस्थांना माणूसपणाची शिकवण द्यायचे. त्यासाठी बाबांनी कुणाकडून असे पैसे घेतले नाहीत. या फकिराने जगाचा संसार सुखी करण्यासाठी आपला संसार स्वत:च्या हाताने मोडून टाकला. श्री श्रींसारख्या बुवा-महाराजांना ऐश्वर्याचे आकर्षण असते. भक्तांच्या गर्दीने ते मोहरून जातात व राजकारण्यांच्या वाकण्याने दिपून जातात. गाडगेबाबांना असा कुठलाच मोह नव्हता. काही वर्षांपूर्वी शेतकºयांच्या आत्महत्या थांबवतो म्हणून हेच श्री श्री यवतमाळात आले होते. लोकांना हात वर-खाली करायला सांगितले आणि निघून गेले. शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्यात का? नाही. उलट पांढºया फटफटीत कपाळांचा आक्रोश वाढला. या आत्महत्यांचे आज सर्वत्र काहूर माजले असताना त्याच प्रदेशात येऊन श्री श्री रविशंकर अंतरंग वार्तेसाठी लाखो रुपये उकळतात तेव्हा त्यांच्या या जगण्याच्या कलेची घृणा वाटू लागते. गाडगेबाबांनी असा श्रद्धेचा बाजार कधी मांडला नाही. कष्टाशिवाय जगायचे नाही हा त्यांचा दंडक होता. ते मूर्तिजापूरला असतानाची ही गोष्ट, बाबांची मुलगी आलोकाबाई पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. बाळंतपणानंतर मुलगी सासरी परत जाते तेव्हा तिला चोळी-बांगडी करावी लागते. बाबांची पत्नी कुंताबाईला तसे वाटणे स्वाभाविक होते. तिने ही गोेष्ट बाबांच्या कानावर टाकली. बाबा आलोेकाबाईला म्हणाले, ‘‘बाई गं, बाप जर एकपट साधू असेल तर मुलांनी दहापट साधू झाले पाहिजे. तू असं कर सासरी जाईपर्यंत शेण गोळा करून गोेवºया लाव आणि ते विकून जे पैसे येतील त्यातून चोळी-बांगडी करून घे’’ हा असा विरक्त बाप. श्री श्रींच्या योगवार्तेत बापामधील ही विरक्ती असते का?एकदा प्रवासात कुंताबाई बाबांसोबत होती. तिने प्रवासासाठी सामान घेतले. स्टेशनवर आल्यानंतर बाबांनी कुंताबाईजवळील सामान गरिबांना वाटून दिले. गाडेबाबांसारखे आपण निरिच्छ वागू शकत नाही. पण किमान आपल्या दारात आलेल्या भिकाºयाला ताटातली चतकोर भाकर देण्याचे दातृत्व तरी हे श्री श्री त्यांच्या ध्यानसाधनेतून सांगतात का? बाबांनी शेकडो धर्मशाळा बांधल्या. पण, या धर्मशाळांमध्ये मुलांना कधी राहू दिले नाही. अन्नछत्रात रोेज कितीतरी अंध-अपंग जेवायचे. पण, इथेही घरच्यांना प्रवेश नव्हता. श्री श्रींनी असा अनासक्त योग कधी सांगितला नाही. दुसºयासाठी जगणे हीच खरी जगण्याची कला. ती गाडगेबाबांनी फार पूर्वी सांगितली. श्री श्री रविशंकर सांगतात तो अप्पलपोटेपणा आहे.