शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सेना, आलेपाक अन् सीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:17 IST

स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसंपन्न देशातील डावोस येथे भरलेल्या वैश्विक आर्थिक परिषदेला हजेरी लावून आलेले सीएम आज भलतेच प्रफुल्लित दिसत होते. अलीकडच्या काळात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनांमुळे काळवंडलेल्या चेह-यावर आज प्रसन्नता दिसत होती. स्वित्झर्लंडचे शुद्ध हवा-पाणी (अन् बर्फही!) चांगलेच मानवल्याचे जाणवत होते.

- नंदकिशोर पाटील स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसंपन्न देशातील डावोस येथे भरलेल्या वैश्विक आर्थिक परिषदेला हजेरी लावून आलेले सीएम आज भलतेच प्रफुल्लित दिसत होते. अलीकडच्या काळात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनांमुळे काळवंडलेल्या चेह-यावर आज प्रसन्नता दिसत होती. स्वित्झर्लंडचे शुद्ध हवा-पाणी (अन् बर्फही!) चांगलेच मानवल्याचे जाणवत होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या जागतिक परिषदेला हजेरी लावण्याचा मान मिळाल्यानंतर कोण सुखावणार नाही? शिवाय, भाजपशासित अठरा राज्यातील मुख्यमंत्र्यांमधून फक्त महाराष्ट्राचा नंबर लागला असेल, तर ती मोठीच अ‍ॅचिव्हमेन्ट! मनोमन ते मोदीजींचे लाख लाख आभार मानत असले पाहिजेत. मंत्रिमंडळातील सहकाºयांचा जेवढा भरोसा आहे, त्याहून कैक पटीने मोदीजींचा आपल्यावर विश्वास आहे, ही बाबही दिलासादायक आहे म्हणा. डावोसमध्ये फक्त महाराष्ट्राचा एकमेव स्टॉल लागलेला होता. जगभरातील उद्योगपतींनी या स्टॉलला भेट दिली अन् महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा बोलून दाखवली. राज्यात आता कोट्यवधीची गुंतवणूक येणार, हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आणि त्यातून राज्याचा जीडीपी उंचावणार, या कल्पनेत सीएम अक्षरश: हरखून गेले होते. आज साहेबांचा मूड चांगला दिसतोय, हे हेरून एका स्वीय सहाय्यकाने एक पार्सल त्यांच्या पुढ्यात आणून ठेवले. न बोलता खुणेनंच सीएमनी विचारलं, ‘काय आहे हे?’ स्वीय सहाय्यक कानाजवळ जात पुटपटले, ‘मातोश्रीवरून आलंय!’कपाळावर आठ्या आणत साहेबांनी ते पार्सल फोडायला सांगितलं. उघडून बघतो तर काय, आलेपाकाच्या वड्या, शारंगधर काढा अन् स्ट्रेपसीलच्या गोळ्या, अन् एक चिठ्ठी!सीएमनी चिठ्ठी वाचायला घेतली.प्रिय मुख्यमंत्री,जय महाराष्ट्र!आपल्यापर्यंत वार्ता आलीच असेल की, आपण डावोसला असताना इकडे आमच्या मावळ्यांचा राष्ट्रीय मेळावा झाला. होय, राष्ट्रीयच तो! आता आम्हीही अ.भा. (अर्थात, अखिल भारतीय) होऊ घातलो आहोत आणि त्याचकरिता आम्ही स्वबळाची गर्जना ठोकली आहे. यापुढे आम्हांस्नी कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. जगदंबेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच. कमळाबाईसोबत संसार थाटून आम्ही आमच्याच पायावर दगड मारून घेतला, हे बारामतीकरांचे म्हणणे आम्हांस पटले आहे. गेली साडेतीन वर्षे रडतखडत आपला संसार सुरू आहे. अधूनमधून कुरबुरी होतात...भांड्याला भांडे लागते. केवळ आपल्या हसºया चेहºयाकडे बघत आम्ही आलेला दिवस ढकलत आहोत. पण मुलंही आता मोठी झालीत. त्यांना ‘शत प्रतिशत’ मालकीचं घर हवंय. कधीतरी वेगळं व्हायचंच होतं. मग म्हटंल, आताच मुर्हूत काढून ठेवू या. ऐनवेळी धावपळ नको. कमळाबाईचा काही भरोसा नाही. तसा व्यक्तिश: आमचा तुमच्यावर राग नाही. पण ते गुजरातचे ‘शहा’वल्ली कधी आक्रमण करतील, याचा नेम नाही. लोभ आहेच. कायम राहावा.जय महाराष्ट्र!ता.क.-डोवोसच्या बर्फामुळं आपला घसा बसल्याचे कळते. सोबत आलेपाक पाठवला आहे. सकाळ-संध्याकाळ तोंडात ठेवत जा!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार