शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या तरुण मुलांकडे आपले पुरेसे लक्ष आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 04:48 IST

चाळिशीत आजारी पडणारी मोठी लोकसंख्या, की आनंदी लोकांचा चैतन्यमय समाज?- यातली निवड आता, आजच करायला हवी आहे!

डॉ. गौरी करंदीकर, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अडोलसंट हेल्थ (IAAH) तर्फे जगभरात १३ ते १९ ऑक्टोबर हा ‘जागतिक पौगंड आठवडा’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचे घोषवाक्य आहे : Thriving Inside and  Out -Strengthening Adolescent Physical And Mental Health. १२-२५ वयोगटातील तरुण मुले आणि मुली. या तरुण मंडळींना असलेल्या सुखसोयी आधीच्या पिढ्यांच्या तुलनेने जास्त दिसत असल्या तरी त्यांना येणाऱ्या अडचणी - आरोग्य, करिअर, सामाजिक नातेसंबंध, मैत्री- या अनेक पटीने जास्त आहेत. या अडचणींचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

आर्थिक सुधारणा, शहरीकरणामुळे खाण्यापिण्याची उपलब्धता वाढली आहे. परंतु, भारतातल्या या वयोगटात ॲनिमियाचे (शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता) प्रमाण वाढते आहे.  एकीकडे स्थूलता आणि दुसरीकडे अत्यंत कमी वजन असा विरोधाभास मोठा आहे.  जंकफूडचे प्रमाण वाढल्याने आहारात जीवनसत्त्वांची कमतरता मोठी आहे. आपण काय खावे यावर सोशल मीडिया, मित्रमंडळींचा प्रभाव असल्याने परिस्थिती अवघड होते. व्यसनांना आलेली प्रतिष्ठाही वाढते आहे.  तरुणांत मानसिक अस्वास्थ्य भयावह रीतीने वाढताना दिसते. तासनतास स्क्रीनसमोर बसल्याने मान आणि पाठीचे विकार वाढत आहेत. त्यात घरातून अभ्यास आणि ट्युशनचे प्रेशर, सोशल मीडियाचे व्यसन यामुळे तरुणांमध्ये पीसीओएस आणि मेटॅबोलिक सिंड्रोम म्हणजेच वाढलेले कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि स्थूलता याचे परिणाम दिसू लागले आहेत.

आयुष्याला स्थिरता देणारी चांगली मैत्री अभावाने मिळते. जोडीदाराबरोबरच्या नात्यामध्ये स्थैर्य आणि विश्वास असेल याची शाश्वती नाही. यामुळे मन कायम संभ्रमावस्थेत असते. कौटुंबिक वातावरण एकलकोंडे, त्यातून शिक्षण आणि नोकरीसाठी  एकटे राहण्याची वेळ, आपले घर सोडून इतर शहरांमध्ये इतर देशांमध्ये राहण्याची गरज आणि एक महत्त्वाकांक्षा यामुळे मुलांना अनेक वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दक्षिण आशियामध्ये प्रत्येकी ४ पैकी १ तरुण व्यक्ती एकटेपणा बरेच वेळा अनुभवते, असा निष्कर्ष लॅन्सेटमधल्या संशोधनात प्रसिद्ध झाला आहे.  

बदलत्या जागतिक परिस्थितीचा व्यक्तिगत आयुष्यातील शिक्षण, नोकरी यावर होणारा परिणाम हा या वयातल्या काळजीचा एक नवाच मुद्दा! त्यातूनही ताण आणि मानसिक अस्वास्थ्य वाढते. हे बदल आता शहरातून ग्रामीण भागातही झिरपले आहेत. महाराष्ट्रामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ग्रामीण मुला-मुलींपैकी २१ टक्क्यांमध्ये नैराश्याचे प्रकार दिसून येतात, शहरांमध्ये २५ टक्के मुले ही नैराश्याला बळी पडलेली आहेत.

एकुणातच तरुण वयात जगण्यासाठी धडपड करण्याची वेळ या मुलांवर आलेली आहे. म्हणूनच यावर्षीच्या पौगंड आठवड्याचे घोषवाक्य आहे thrive म्हणजे नुसतं survive नव्हे, तर आनंदाने, मनमोकळेपणाने, उदार मनाने जगणे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघणे. शरीराच्या स्वास्थाबरोबरच मनाच्या स्वास्थ्याकडेही लक्ष देणे! मनातून उमेद असणे, जग एक्सप्लोर करण्याची जिद्द असणे, आनंदी व मोकळ्या श्वासाने जगणे या गोष्टी तरुण मनांमध्ये रुजवण्याची गरज आहे. 

एक कुटुंब म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचा आहार, विहार, झोप, डिजिटल माध्यम वापरण्याची संस्कृती आणि मुलांच्या मानसिक स्वास्थ्याकडे बारीक लक्ष असणे गरजेचे, अपेक्षित आहे. शाळांमध्ये मैत्री व मित्रपरिवार जपणे, व्यायाम, खेळायचे तास, जीवनकौशल्ये शिकणे यांना प्राधान्य देणे जरुरी आहे. लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या जास्त असणे पुरेसे नाही, तरुण पिढीचा पाया  शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम असेल तरच आपला देश आणि हा समाज सक्षमपणे पुढे जाऊ शकतो. चाळिशीत आजारी पडणारी एक मोठी लोकसंख्या की आनंदी, उत्साही लोकांचा चैतन्यमय समाज?- यातली निवड आपल्याला आता, अगदी आजच करायला हवी आहे! khrc@hotmail.com

 

English
हिंदी सारांश
Web Title : Are you paying enough attention to your young children?

Web Summary : Adolescent health faces challenges like anemia, obesity, and mental health issues. Social media, academic pressure, and loneliness contribute. Prioritize healthy habits, mental well-being, and family support for a thriving future generation. A healthy young generation will lead to a stronger nation.
टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइल