शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
4
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
5
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
6
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
7
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
8
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
9
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
10
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
11
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
12
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
13
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
14
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
15
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
16
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
17
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
18
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
19
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय

दृष्टिकोन - कर्नाटक सरकारचा भाषिक दहशतवाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 06:26 IST

बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन ४०० कोटी रुपये खर्चून विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचा वर्षातून केवळ दोन आठवडे वापर केला जातो.

वसंत भोसले । संपादक, कोल्हापूर आवृत्तीमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढाकाराने दरवर्षी हिवाळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. उस्मानाबाद येथे नुकतेच ९३वे संमेलन उत्साहात पार पडले. तसे याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील सीमावर्ती मराठी भाषिक लोक साहित्यावर प्रेम करतात. येळ्ळूरपासून निपाणीजवळच्या महाराष्ट्राच्या सीमेवरील कारदग्यापर्यंत गावोगावी मराठी साहित्य संमेलने होत असतात. येळ्ळूर, कुद्रेमनी, इदलहोंड, कडोली, कारदगा आदी गावांतील मराठी भाषिक मंडळी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आपल्या बोली भाषेचा उत्सव साजरा करतात. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक, विचारवंत, संपादक, पत्रकार आदींना आमंत्रित करण्यात येते. ग्रंथदिंड्या निघतात.

उद्घाटनाची प्रदीर्घ भाषणे होतात. कविसंमेलने, चर्चासत्रे, प्रकट मुलाखती, व्याख्याने आदींची रेलचेल असते. सीमावादात कर्नाटकात अडकलेली ही मराठी भाषिक माणसे मातेवर प्रेम करावे, तसे या संमेलनात उपस्थित राहून महाराष्ट्रातील पाहुण्यांची मराठी कानात साठवीत असतात.

कर्नाटकातील भाषा संवर्धनाच्या नावाने थयथयाट करणाऱ्या कन्नड संरक्षण संघटनेच्या तथाकथित भाषाप्रेमींना याचा पोटशूळ उठतो. या वर्षी त्याचे प्रमाण अधिकच आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये साजरे होणारे मराठी भाषेचे साहित्य आणि संस्कृतीचे सोहळेच बंद पाडण्याचे उद्योग त्यांनी चालविलेले आहेत. प्रथम या कन्नड संरक्षकांनी मराठी भाषिकांवर राग व्यक्त केला. त्याला प्रशासनाने साथ द्यायला सुरुवात केली, याचे आश्चर्य वाटते. भारतीय प्रशासन सेवा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांनी मराठी भाषेचे साहित्य संमेलन आयोजन करणाºयांना नोटिसा देण्याचा सपाटा लावला. अशा मराठी भाषिक साहित्य संमेलनाने समाजात तेढ निर्माण होते, असा शोध या अधिकाºयांनी लावला आहे.

वास्तविक, गेली अनेक वर्षे येळ्ळूर, कडोली, निपाणी, कारदगा आदी ठिकाणी मराठी साहित्य संमेलने होत आली आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला नाही. तसा कोणताही इतिहास नसताना प्रशासनाने धडाधड परवानगी नाकारण्याचे सत्र सुरू केले आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन करणाºयांना नोटीस देऊन दहशत निर्माण करण्यात येत आहे. बेळगावनजीकच्या कडोली या गावाला स्वातंत्र्यलढ्याची मोठी परंपरा आहे. त्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या पुढाकारानेच मराठी साहित्य संमेलने सुरू झाली. या स्थानिक साहित्य संमेलनापूर्वी बेळगावला दोन वेळा मराठी साहित्य संमेलने झाली. १९४६ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याच्या मागणीचा ठराव संमत झाला.

त्यानंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची स्थापना झाली. तत्पूर्वी चार वर्षे आधी कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त कर्नाटक आणि महागुजरात स्थापन करण्यासाठी त्या-त्या प्रांतात आंदोलने झाली. मात्र, त्यात कटुता किंवा दहशतवादाची भाषा नव्हती. आजही सीमाभागात मराठी आणि कानडी भाषेत सभा होतात. निवडणूक प्रचाराच्या सभा होतात. बेळगावातील बहुतांश लोकप्रतिनिधींना दोन्ही भाषा अवगत आहेत. सीमावादाचा निकाल योग्य निकषावर न झाल्याने कर्नाटकात राहिलेल्या मराठी भाषिकांना स्वभाषेत व्यवहार करण्यास अटकाव करण्यात येत आहे. आता या भाषेची साहित्य संमेलनेही होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहे. या आंदोलनाला हिंदुत्वाची किनारही आहे. परिणामी कर्नाटक आणि केंद्रातील भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे.

बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन ४०० कोटी रुपये खर्चून विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचा वर्षातून केवळ दोन आठवडे वापर केला जातो. अन्य पन्नास आठवडे ती इमारत पडून असते. इतक्या रकमेत एखादे छोटे धरण बांधून झाले असते. मात्र, मराठी भाषेच्या द्वेषाने पछाडलेले कन्नड वेदिके किंवा संवर्धनाच्या नावाने मराठी भाषेची, तसेच मराठी भाषिकांवर अन्याय करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हा साहित्य संमेलनावर बंदी घालण्याचा प्रकार तसाच आहे. यावर टीका झाल्यावर महाराष्ट्रातील वक्त्यांना न बोलाविण्याच्या अटीवर परवानगी देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. या देशातील लेखक, साहित्यिक किंवा विचारवंत दुसºया राज्यात निमंत्रित करायचा नाही हे राज्यघटनेतील कोणत्या अधिकाराच्या आधारे ठरविता येते? कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी काम करण्याच्या नावाखाली दुसºया भाषिक लोकांवर दहशत निर्माण करणारा हा थयथयाट आहे.

टॅग्स :marathiमराठीKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव