शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

भाष्य - अण्णा, थोडं थांबा !

By admin | Updated: March 31, 2017 00:13 IST

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझं मन मला सांगतंय, आंदोलन कर, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे सूतोवाच केले आहे. मोदी सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, असंही निरीक्षण अण्णांनी नोंदविले आहे. आंदोलन करावं की नाही, हा सर्वस्वी अण्णांचा वैयक्तिक मामला आहे. अण्णांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून आंदोलन उभारलं तरी त्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण गेल्या तीन-चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. भ्रष्टचाराच्या विरोधात अण्णांनी आजवर मोठा लढा दिलेला आहे. २०११ साली दिल्लीत रामलीला मैदानावर ऐतिहासिक असे आंदोलन उभे केले. ज्याची दखल ‘टाइम’सारख्या जागतिक माध्यमांनी घेतली. अण्णांच्या या आंदोलनामागे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आणि ‘टीम अण्णा’च्या बॅनरखाली अरविंद केजरीवाल, किरण बेदी, योगेंद्र यादव, भूषण पितापुत्र आणि असंख्य ज्ञात-अज्ञातांचे पाठबळ होते. शिवाय, ‘मी अण्णा’ अशा टोप्या परिधान केलेला आणि कथित नागरी समाजाच्या नावाखाली उदयाला आलेला मेणबत्ती पंथही होता. ज्यांनी आजवर गांधी नावाच्या माणसाचा कमालीचा तिरस्कार केला, त्यांनीच अण्णांचा ‘दुसरे गांधी’ म्हणून उदोउदो केला. पण अण्णांच्या या जागरात सामील झालेल्या प्रत्येकाचे ईप्सित काही वेगळेच होते, हे कालांतराने सिद्ध झाले. केजरीवाल, बेदी, व्ही.के. सिंग आदिंनी आपापली राजकीय पोळी शेकून घेतली, तर भाजपादी पक्षांनी तत्कालीन संपुआ सरकारच्या विरोधात जनमत निर्माण करण्यासाठी अण्णांच्या आंदोलनात हवा भरली. अण्णा, रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले असताना सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले घाणाघाती भाषण अनेकांना आठवत असेल. देशातील प्रसारमाध्यमांनी तर अण्णांना अवतारी पुरुष बनवून टाकले होते. आज अण्णांनी पुन्हा आंदोलन उभारले तर, हे सगळे पुन्हा घडून येईल का? शंकाच आहे. कारण, तेव्हाचा मेणबत्ती पंथ आता मोदींचा भक्त बनलेला आहे. केजरीवाल, सिसोदिया, बेदी, सिंग आदिंनी राजकीय चूल मांडली असल्याने ते अण्णांच्यासोबत येण्याची शक्यता दिसत नाही. मीडिया अण्णांच्या मागे उभा राहील, याचीही शाश्वती देता येत नाही. शिवाय, मोदींच्या विरोधात ब्र ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत मोदीभक्त युवक तयार नाही.अण्णांनी मोदी सरकारवर वहीम ठेवलाच, तर लागलीच समाजमाध्यमातून त्यांच्या प्रतिमाहननाची मोहीम सुरू होईल. वेळप्रसंगी आंदोलनही उधळून लावले जाईल. अण्णांचा वापर संपुआ सरकार घालविण्यासाठी केला गेला म्हणून काँग्रेसवाले अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतील, शंकाच आहे. आणि जरी राहिले तरी त्यांच्यावरील डाग अजून धुतला गेलेला नाही. त्यामुळे तसाही काही फायदा नाही. तात्पर्य, आंदोलन करण्यापूर्वी अण्णांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा.