शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अनिकेत जाधवची नवी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:10 IST

कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधवला जमशेदपूर एफसी संघाने दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन देऊन करारबद्ध केले आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधवला जमशेदपूर एफसी संघाने दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन देऊन करारबद्ध केले आहे. महाराष्ट्रातील तो सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर जगभर चढलेला असतानाच कोल्हापूरच्या अनिकेत जाधवने महाराष्ट्राच्या फुटबॉल विश्वात नवा इतिहास घडविला आहे. जमशेदपूर एफसी संघाने त्याला दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन देऊन करारबद्ध केले आहे. हा महाराष्ट्रातील एखाद्या फुटबॉल खेळाडूबाबतचा सर्वात मोठा करार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातील आजवरचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच केला आहे.भारत हा क्रिकेटवेडा देश समजला जातो. या देशात फुटबॉलवेडेही कमी नाहीत. मात्र, भारतीय फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावा तसा चमकू शकला नाही. त्याला अनेक कारणे असली तरी बायचुंग भुतिया, सुनील छत्री यासारख्या खेळाडूंनी भारतीय फुटबॉलला लोकप्रिय बनविले आहे. फुटबॉल म्हटले की भारतात कोलकाता, केरळ आणि गोवा हीच नावे समोर येतात. यात कोल्हापूरचाही समावेश करावा लागेल. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच कोल्हापुरात फुटबॉल खेळले जाते. स्पर्धा होतात. कोल्हापूरची फुटबॉल परंपरा मोठी आहे. कोल्हापूरने देशाला अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू दिले आहेत. नव्या पिढीमध्ये अनिकेत जाधव हा सध्याचा कोल्हापुरातील आणि भारतीय फुटबॉल विश्वातील उदयोन्मुख चमकता तारा आहे. आतापर्यंत त्याने २०१७ मधील १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, २०१६ मधील गोव्यात झालेली आंतरराष्ट्रीय युथ फुटबॉल स्पर्धा, आशियाई युवा चषक फुटबॉल स्पर्धा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या सातत्यपूर्ण खेळाने त्याने भारतातील अनेक फुटबॉल संघांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याला करारबद्ध करण्यासाठी अनेक संघांकडून विचारणा होत होती. यात जमशेदपूर एफसी संघाने बाजी मारत दोन वर्षांसाठी ४९ लाखांचे मानधन अनिकेतला देऊ केले आहे. दोन दिवसातच याचे सोपस्कार पार पडतील आणि अनिकेत जमशेदपूर एफसी संघाकडून खेळताना दिसू लागेल.रिक्षाचालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू असा अनिकेतचा प्रवास. अवघ्या १७ व्या वर्षी त्याला जगातील २३ देशांतील संघाविरोधात खेळण्याची संधी मिळाली आहे. अशी कामगिरी करणारा तो कोल्हापुरातील एकमेव फुटबॉलपटू आहे. वडील रिक्षाचालक, आई गृहिणी अशा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनिकेतचे तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षक कोल्हापूरजवळील हळदी (ता. करवीर) विद्यामंदिर येथे झाले. या शाळेच्या मैदानावर फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरवले. चौथीला सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीत तो दाखल झाला. पाचवीपासून तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत शिकत आहे. त्याचा हा प्रवास कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा आहे. भारतात क्रिकेट त्याखालोखाल कबड्डी लोकप्रिय आहे. आयपीएल, प्रो-कबड्डी यासारख्या व्यावसायिक स्पर्धांनी या खेळांना लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा हातभार लावला आहे. फुटबॉल यामध्ये कमी पडत आहे. त्यामुळेच भारताचा फुटबॉल संघ आजपर्यंत विश्वचषकात एकदाही खेळू शकला नाही. तसे दिग्गज खेळाडूही अपवाद वगळता तयार होऊ शकले नाहीत. भारतातील फुटबॉलमध्येही अशीच व्यावसायिकता आली तर नवनवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलपटू तयार होऊ शकतील. त्यादृष्टीने सरकार आणि क्रीडा खात्यानेही प्रयत्न करायला हवेत.