शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 06:53 IST

AAAS Report: गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिका हा वैश्विक वैज्ञानिक प्रतिभेचा स्वर्ग मानला जातो. पण...

अमेरिका आज सुपरपॉवर का आहे? अमेरिकेकडे सर्वाधिक शस्त्रास्त्रं, आण्विक ताकद आहे म्हणून? त्यांच्याकडे सर्वाधिक समृद्धी आहे म्हणून? की तांत्रिकदृष्ट्या तो सर्वाधिक प्रगत देश आहे म्हणून?... अमेरिका सुपरपॉवर असल्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेत सर्वाधिक संख्येनं असलेले संशोधक आणि वैज्ञानिक! त्यांची प्रतिभा आणि विज्ञानात त्यांनी मोठ्या प्रमाणात घातलेली भर यांमुळेच संपूर्ण जगात अमेरिकेचा दबदबा आहे. अनेक मूलभूत संशोधनं आणि शोध अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनीच लावलेले आहेत. अमेरिका सुपरपॉवर होण्यात या संशोधकांचा वाटा सर्वांत मोठा आहे. 

गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिका हा वैश्विक वैज्ञानिक प्रतिभेचा स्वर्ग मानला जातो; पण सध्या काय स्थिती आहे? ‘संशोधकांचा देश’ म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेतील संशोधकांच्या दृष्टीनं सध्याचा काळ आजपर्यंतचा सर्वाधिक अस्वस्थ काळ आहे. आजवर उच्च शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी जगभरातील प्रतिभावंत अमेरिकेकडे धाव घेतात; पण सध्या उलटंच होताना दिसतं आहे. 

‘आपल्यासाठी, संशोधनासाठी हा देश योग्य नाही’, असं अमेरिकेतल्याच बहुसंख्य संशोधकांना वाटतं आहे. त्यामुळे हे संशोधक अमेरिका सोडून दुसऱ्या देशांना पसंती देत आहेत. आतापर्यंत बऱ्याच संशोधकांनी अमेरिकेला रामराम ठोकून दुसऱ्या देशांत जाणं पसंत केलं आहे. किती असावी ही गळती? गेल्या सुमारे ८० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेला ‘ब्रेन ड्रेन’चा सामना करावा लागतोय! अर्थातच पुन्हा एकदा त्याचं कारण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची संशोधनविषयक नीती! अलीकडेच ट्रम्प यांनी संशोधन निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, प्रवासी विद्यार्थ्यांवर बंधनं आणली आहेत, शैक्षणिक स्वतंत्रतेवर हल्ले सुरू केले आहेत! ट्रम्प यापुढे आणखी काय-काय करतील आणि संशोधन क्षेत्राचं किती नुकसान करतील, या भीतीनं संशोधकांनी आधीच अमेरिकेला ‘नमस्कार’ केला आहे! यामुळे अमेरिकेच्या जागतिक दर्जालाच आव्हान निर्माण झालेलं नाही, तर त्यांच्या नावीन्यतेच्या क्षमतेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

‘अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स’नं आपल्या अहवालात म्हटलं आहे, अनेक संशोधकांनी आधीच देश सोडला आहे आणि जवळपास ७५ टक्के संशोधक युरोप किंवा आशियात संशोधनासाठी ‘सुरक्षित’ जागा, संधी शोधत आहेत.

आतापर्यंत अमेरिकेतील तब्बल चारशे संशोधकांनी नोबेल पारितोषिक जिंकलं आहे, त्यात एक तृतीयांश संशोधक परदेशांतून अमेरिकेत आले होते, पण आता साराच बदल होतो आहे. ट्रम्प प्रशासनानं नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या अनुदानात २०२६मध्ये अचानक ४० टक्के कपात केली आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशनचं १३ हजार कोटी रुपयांचं अनुदान रद्द करण्याची धमकी दिली आहे. संशोधन क्षेत्रातील निधीत अचानक घट झाल्यामुळे अनेक संशोधन प्रकल्प बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

२०१५पर्यंत अमेरिकेत दरवर्षी ६० हजारांपेक्षा जास्त संशोधक परदेशांतून येत होते, २०२४मध्ये ही संख्या २३ हजारापर्यंत घटली. या वर्षी तर हा आकडा १५ हजारांच्याही खाली जाण्याची भीती आहे. दुसरीकडे, इतर देश मात्र संशोधनासाठी मोठमोठ्या ऑफर्स देत आहेत, त्यामुळे अमेरिकन संशोधक इतर देशांत आसरा घेत आहेत !...

टॅग्स :AmericaअमेरिकाResearchसंशोधन