शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांची ठिणगी; जगात पुन्हा व्यापारयुद्ध पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:34 IST

ट्रम्प यांच्या दबावाचा सामना भारत कसा करतो, दोन महाशक्तींच्या वादात आपले हित कसे साधतो, हे पाहावे लागेल. 

रशिया-युक्रेन युद्धाविषयी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत. पण, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपले ऐकले नाही तर महायुद्ध अटळ आहे. प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे व बॉम्बगोळ्यांचे हे महायुद्ध खरेच पेटेल का, याचे भाकीत कोणी करू शकत नाही. परंतु, खुद्द ट्रम्प यांच्यामुळे जगात व्यापारयुद्धाची ठिणगी मात्र नक्की पडली आहे. 

चीन, कॅनडा व मेक्सिको यांच्याविरोधात ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफ तत्काळ प्रभावाने लागू केले आहे. इतर देशांचे रेसिप्रोकल टेरिफ २ एप्रिलला अंमलात येणार आहे. तुम्ही अमेरिकेच्या मालाला जसा आयात शुल्क आकाराल तितकेच तुमच्या उत्पादनांवरही आकारले जाईल, अशी ट्रम्प यांची रोखठोक भूमिका आहे. मजेशीर बाब म्हणजे आपले निर्णय अंमलात आणताना ट्रम्प काहीतरी तात्कालिक कारण शोधतात. झेलेन्स्की यांच्याशी वादासाठी ‘तुम्ही आमच्या विरोधकांचा प्रचार केला’ हे कारण होते. भारतासह विविध देशांना दिलेली मदत थांबविताना, ‘ज्यो बायडेन यांना कुणाला तरी निवडून आणायचे होते’, अशी पुडी सोडली. 

आता चीनवर करबंधने लादताना एका औषधाच्या तस्करीचा मुद्दा पुढे आणला आहे. ट्रम्प यांच्या अतिरेकावर उतारा म्हणून कोणते औषध वापरायचे या चिंतेत जग असताना फेंटानिल या वेदनाशामक औषधाच्या तस्करीचे निमित्त ट्रम्प यांनी शोधले आहे. शस्त्रक्रियेसाठी भूल देताना सोबत फेंटानिल सायट्रेट हे वेदनाशामक इंजेक्शन वापरतात, त्याच्या गोळ्याही आहेत. चीनमधून छुप्या मार्गाने हे औषध अमेरिकेत पोहोचते, असा ट्रम्प यांचा आराेप आहे. हे कारण नाटकीय असल्याचे प्रत्युत्तर चीनने दिले आहे.

केवळ चीनच नव्हे, तर ट्रम्प यांच्या निशाण्यावर युरोपियन युनियन आणि ब्राझील, भारत, दक्षिण कोरिया हे देशही आहेत. चीन व कॅनडाने अमेरिकेच्या दांडगाईला जोरदार उत्तर दिले असून, तुम्हाला टेरिफ वाॅर किंवा अन्य कोणतेही युद्ध लढायची खुमखुमी असेल तर आम्ही तयार आहोत, ही चीनची प्रतिक्रिया बरेच काही सांगणारी आहे. या मुद्द्यावर चीनने जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे तक्रार केली आहे. परंतु, तिचा काही फायदा होणार नाही. जागतिक आरोग्य संघटना, क्लायमेट चेंजसंदर्भातील मंच वगैरे सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था-संघटना फाट्यावर मारणारे ट्रम्प डब्लूटीओचे ऐकतील अशी सुतराम शक्यता नाही. 

परिणामी, सगळ्याच देशांची अवस्था सध्या, ‘ठेविले ट्रम्प यांनी तैसेचि राहावे’ आहे. अर्थात, स्थिती अशीच कायम राहील, असे नाही. ट्रम्प यांनी ज्यांच्याशी पंगा घेतला आहे त्या सगळ्या बलाढ्य अर्थव्यवस्था आहेत. हे सर्व देश अमेरिकेच्या आक्रमकतेविरोधात एकत्र आले तर सध्या दिसतो तसा हा सामना एकतर्फी राहणार नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, चीन-अमेरिकेतील व्यापार संघर्षाचा फायदा भारताला होईल असे अनेकजण मानतात. अमेरिका एकाचवेळी संपूर्ण जगाशी पंगा घेणार नाही, असे या मंडळींना वाटते. परंतु, ट्रम्प हे असे अंदाज बांधण्यायोग्य व्यक्ती नाहीत. वरवर ते लहरी व बिनभरवशाचे दिसतात खरे, पण पक्के व्यापारी आहेत. अमेरिकेच्या हितासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि भारत हा सध्यातरी त्यासाठी अपवाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दाैऱ्यात ट्रम्प यांच्या व्यापारीवृत्तीचे दर्शन घडलेच आहे. भारतात अमेरिकन वाहन उद्योगाला पुरेशा सवलती मिळत नाहीत, असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे. अमेरिकन काँग्रेसपुढील पहिल्या भाषणात त्यांनी या आक्षेपाचा स्पष्ट उच्चार केला. हार्ली डेविडसन दुचाकीचा विषय चर्चेत आहे. भारतात आयात होणाऱ्या या दुचाकींवर माफक करआकारणी ट्रम्प यांना हवी आहे. त्याशिवाय, भारतात उत्पादित होणाऱ्या दुचाकींवर जास्तीचे कर आकारून हार्ली डेविडसनच्या विक्रीला पोषक वातावरण असावे आणि भारताचे एकूण व्यापार धोरण इतरही अमेरिकन उत्पादनांबाबत असेच असावे, यासाठी ट्रम्प यांचा दबाव आहे. चीनसारखा भारत अमेरिकेला ललकारणार नाही, हे नक्की. परंतु, ट्रम्प यांच्या दबावाचा सामना भारत कसा करतो, दोन महाशक्तींच्या वादात आपले हित कसे साधतो, हे पाहावे लागेल.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका