शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वं मधु।

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 04:31 IST

धूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु।

- डॉ. गोविंद काळेमधूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु असे मधुकडून त्रिवार म्हणून घेतले. मधूला वाटले वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भटजीनी ‘सर्वं मधु’ असे त्रिवार म्हणून घेतले. म्हणजे तुमचे सर्व काही मधूच आहे असा अर्थ मधूने काढला.मधु म्हणजे मध हा सर्वांना माहीत असणारा लौकिक अर्थ. देवपूजेमध्ये पंचामृत स्नान देवास घालताना ‘मधुस्नानं समर्पयामि’ असे म्हणून पळीतील मधाचा थेंब देवाच्या अंगावर घातला जातो. तर भा. रा. तांबेंच्या गीतात ‘मधु मागसी माझ्या सख्या परि। मधु घटची रिकामे पडती घरी’ असा संदर्भ येतो. जीवनात मधाची आवश्यकता फार आहे. एखादे काम होईना तर लावा साहेबांना मधाचे बोट म्हणजे लवकर काम फत्ते होईल, असे म्हटले जाई. म्हणजे कार्यपूर्तीसाठी मधाचे बोट पाहिजे तर.वैदिक ऋषींची तर प्रार्थनाच होती.‘‘मधु वाता ऋतायते मधुक्षरंति सिन्धव:’’ ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील ९०वे सूक्त. या ठिकाणी मधुचा अर्थ पोषक शक्ती, सुमधुर, सुखकर असा करण्यात आला आहे. मधुने आपल्या जीवनात कायमचेच घर केले आहे. मधुचा मधुकर महिमा भारतीय संस्कृतीने सर्वमान्य केला आहे. आचार्य विनोबा भावेंच्या लहानशा परंतु विचाराने परिप्लुत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे मधुकर.मधूच्या वडिलांची अंत्येष्टी करणाऱ्या भटजींना ‘सर्वं मधु’ हे जे तुम्ही वदवून घेतले या ठिकाणी मधुचा अर्थ काय घ्यावयाचा असे आम्ही विचारले. तेव्हा ते म्हणाले तुम्ही अजून लहान आहात. आपल्या संस्कारांची व्यवस्था पूर्वजांनी मानवी कल्याण डोळ्यापुढे ठेवूनच केली हे नि:संशय सत्य अभ्यासाअंती स्वीकारावे लागते. ‘मधु’ म्हणजे ब्रह्म. ‘सर्वं मधु’ म्हणजे सर्व ब्रह्ममय आहे. मधुचा अलौकिक अर्थ पहिल्यांदाच कुणीतरी समजावून सांगितला होता. नाशवंत विश्वाच्या ठिकाणीसुद्धा पूर्वजांनी ब्रह्म पाहिले. ब्रह्म अनुभविले. ‘ऋषे: तु दर्शनात््’ अशी ऋषींची व्याख्या केली जाते. ब्रह्मैक्य भावच त्यांनी ऋचांतून गायिला. तो जर कळला तर ‘सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु हेच गाणे विश्व आनंदाने गायील.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या