शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

एकमेवाद्वितीय

By admin | Updated: April 24, 2016 03:38 IST

विल्यम शेक्सपिअरच्या वैयक्तिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, पण विल्यमचा बाप जॉन शेक्सपिअर हा १४५२च्या दरम्यान स्ट्रॅटफर्ड अपॉन अ‍ॅव्हान या गावी

- डॉ. अजित मगदूमविल्यम शेक्सपिअरच्या वैयक्तिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, पण विल्यमचा बाप जॉन शेक्सपिअर हा १४५२च्या दरम्यान स्ट्रॅटफर्ड अपॉन अ‍ॅव्हान या गावी स्थायिक झाला होता. जॉन आणि मेरी या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी विल्यम हे तिसरे अपत्य. त्याचा बाप्तिस्मा २६ जुलै १५६४ रोजी झाल्याची स्ट्रॅटफर्डच्या दप्तरी नोंद आहे. मात्र, जन्मतारखेची नोंद नाही. जन्मानंतर साधारणत: तिसऱ्या दिवशी बाप्तिस्मा होतो. या रिवाजानुसार, २३ एप्रिल हाच जन्मदिन असावा, असे आता सर्वमान्य झाले आहे. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूची तारीखही २३ एप्रिल हीच आहे. अवघ्या ५२ वर्षांच्या आयुष्यात त्याने चिरंतन अलौकिकत्व प्राप्त केले. शेक्सपिअरच्या नाटकातून प्रकट होणाऱ्या प्रगल्भ अनुभवातून व ज्ञानातून अनेक अभ्यासकांना तो मानसशास्त्रज्ञ, तर काहींना तत्त्वज्ञ, तर काहींना कायद्यात पारंगत असला पाहिजे, असे वाटते. गायनकला, चित्रकला, तर्कशास्त्र, खेळ, नृत्यकला, करमणुकीचे प्रकार इ. विविध विषयांतील त्याचे ज्ञान सखोल होते.त्याच्या चारशेव्या पुण्यतिथीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांची लयलूट जगभरात होणार आहे. इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय शेक्सपिअर संघ, ‘शेक्सपिअर : सृजन आणि पुनर्सृजन’ हे ब्रीद घेऊन स्ट्रॅटफर्ड अपॉन अ‍ॅव्हान या त्याच्या जन्मगावी आणि लंडन इंथ शेक्सपिअरच्या वैश्विक सांस्कृतिक वारसा आणि स्मृती जागविणार आहे. ही विश्व शेक्सपिअर परिषद २0१६ ही शेक्सपिअरच्या उत्तुंग प्रतिभेला साजेल, अशी एकमेवाद्वितीय ठरावी, म्हणून स्ट्रॅटफर्ड इथे रॉयल शेक्सपिअर कंपनी, शेक्सपिअर बर्थप्लेस ट्रस्ट आणि बर्निंग हॅम विद्यापीठाची शेक्सपिअर इन्स्टिटयुशन या संस्था, तर लंडनमध्ये शेक्सपिअर ग्लोब, लंडन शेक्सपिअर सेंटर आणि किंग्ज कॉलेज लंडन या संस्था कामाला लागल्या आहेत. या परिषदेत ‘किंग लेअर आणि त्याची विविध रूपे’ ‘शेक्सपिअरचं लंडन आणि लंडनचा शेक्सपिअर : समांतर रंगभूमीवरील मनोरंजन’ ‘शेक्सपिअर आणि मध्य व पूर्व युरोप : तेव्हा आणि आता’ ‘शेक्सपिअर आणि आशिया : राजकारण, लिंगभाव आणि सांस्कृतिक आस्मिता’ ‘शेक्सपिअरचा अन्य लेखकांवरील प्रभाव, मॅग्ना/कॉमिक्स अ‍ॅनिमेशन व वैश्विक सिनेमा यातील शेक्सपिअरची पुनर्कल्पित रूपे व झालेली मोडतोड’ संस्कृतीपार शेक्सपिअर : अनुवाद प्रयोग रूपांतरे अशा विषयांवर चर्चासत्रे, तसेच ‘शेक्सपिअरच्या नृत्यांचं पुनर्निर्माण’ ‘शेक्सपिअर आणि संगीत, ‘शेक्सपिअर आणि ग्लोब’ इत्यादी कार्यशाळा आयोजिल्या आहेत. यात जगभरातील तज्ज्ञ अभ्यासकांचा समावेश असून, भारतातील रिटा बॅनर्जी जेएनयूतर्फे सहभागी होणार आहेत. येत्या २३ व २४ एप्रिल रोजी लंडनच्या ग्लोब थिएटरची एक नवोन्मेषी अदाकारी कंप्लीट वॉक - म्हणजे वेस्टमिन्स्टर ते टॉवर ब्रीज दरम्यानचा थेम्स नदीचा अडीच मैलाच्या किनाऱ्यावर ३७ पडद्यांवर शेक्सपिअरच्या ३७ नाटकांची वैशिष्ट्ये रेखाटणारी १0 मिनिटांच्या स्थळांसह बिनीच्या कलावंतांची पेशकश आस्वादायला मिळणार आहे. लंडन लायब्ररी आयोजित प्रदर्शनात त्याच्या १0 महत्त्वाच्या कलाकृतीचे सादरीकरण व विशेष म्हणजे, शेक्सपिअरच्या हस्ताक्षरातील अस्तित्वात असलेल्या एकमेव नाटकाची प्रतही पाहायला मिळणार आहे.सर्वात अभिनव कार्यक्रम म्हणजे ग्लोब थिएटर निर्मित ‘हॅम्लेट’ नाटक जगातल्या प्रत्येक देशात १६ नाट्यकलावंतांचा समूह दोन वर्षांच्या कालावधीत सादर करणार आहेत. ‘ग्लोब टु ग्लोब’ हा नाट्यप्रवास त्याच्या ४५0 व्या जन्मदिनी म्हणजे २३ एप्रिल २0१४ ला सुरू झाला असून, २३ एप्रिल २0१६ त्याच्या ४00 व्या पुण्यतिथीनिमित्त अखेरचा प्रयोग होणार आहे. बीबीसी १ वर रसेल डेव्हिया दिग्दर्शित ‘मिडसभर नाइट्स ड्रीम’ या गाजलेल्या नाटकाचं रूपांतर सादर करणार आहे, तर बीबीसी २ वर २३ एप्रिलच्या रात्री आॅपेरापासून ते जॅझपर्यंत प्रत्येक कलाप्रकारात शेक्सपिअरचा प्रभाव अधोरेखित करणारा कार्यक्रम होणार आहे. शेक्सपिअरच्या गावातही मिरवणूक कसरतीचे कार्यक्रम, आतषबाजी याबरोबरच मान्यवर अभिनेते त्याच्या नाटकातील गाजलेली स्वगते सादर करणार आहेत.आधुनिक मानसशास्त्रीय ज्ञानातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या मानवी स्वभावाचा नमुना शेक्सपिअरच्या पात्रात आढळतो. त्याच्या नाटकात राजे, उमरावांपासून गरीब, पददलितांपर्र्यंत पात्रे आहेत. प्रेमाच्या विविधरंगी छटा ज्युलिएट, हॅम्लेटची आई इ. पोक्त स्त्रियांच्या व्यक्तिरेखांद्वारे मांडलेल्या पाहणं हे नितांत मनोरंजक ठरेल. मार्मिक विश्लेषणाबरोबरच त्याची भाषाशैली, आशय व नाट्यतंत्र इत्यादीतील मातब्बरी वादातीत आहे. प्रेमाप्रमाणेच, असूया, सूड, संशय, मत्सर, महत्त्वाकांक्षा इ. मानवी मनोव्यापारांचे अतिशय सूक्ष्म व वास्तव चित्रण करणारा सर्वात मोठा लेखक म्हणून शेक्सपिअरला जगभर मानण्यात येते. त्याच्या प्रत्येक नाटकात काव्य आहे. अनेकदा आशयपूर्ण संवादाकरिता ब्लॅक व्हर्स या वृत्ताचा सुंदर वापर करून त्याने स्वत:ची अशी स्वतंत्र काव्यशैली निर्माण केली. अनेक संवादातील/स्वगतामधील शब्द सामर्थ्य, नाट्यमाधुर्य, संदर्भाद्वारे प्रकट होणाऱ्या अर्थछटा आणि त्यातून व्यक्त होणारा विचार आणि तत्त्वज्ञान या साऱ्यांमुळे शेक्सपिअर एकमेवद्वितीय ठरला आहे. त्यामुळेच तो स्थल, काल, प्रदेशाच्या सर्व मर्यादा ओलांडून गेली. चारशे वर्षे जगातील रसिकांवर अधिराज्य गाजवत आहे आणि या पुढेही गाजेल.शेक्सपिअर म्हणजे एक दंतकथा अशा अनेक संज्ञाद्वारे विल्यम शेक्सपिअर या जगतविख्यात नाटककाराचं महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्याने लिहिलेली ३७ नाटके व काही खंडकाव्ये यावर ग्रंथालये भरतील, एवढे वाङमय गेल्या चारशे वर्षांपासून अखंडपणे प्रसिद्ध होत आहे. २३ एप्रिल २0१६ला त्याला जाऊन ४00 वर्षे पूर्ण झाली.यानिमित्त जगभरात वर्षभर भरपूर कार्यक्रम होणार आहेत.आधुनिक मानसशास्त्रीय ज्ञानातील प्रत्येक प्रकारच्या मानवी स्वभावाचा नमुना त्याच्या पात्रात आढळतो.नाटकात ज्युलिएट, हॅम्लेटची आई इ. स्त्रियांच्या व्यक्तिरेखा मांडलेल्या पाहणं हे नितांत मनोरंजक ठरेल.त्याच्या नाटकात राजे, उमराव गरीब अशी अनेक पात्रे आहेत. अनेक तरुण-तरुणींची पात्रेही बेमालूमपणे रेखाटली आहेत.