शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदच्या सुटकेनंतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:53 IST

सईदच्या सुटकेनंतर व्हाईट हाऊसची अगदीच कोमट प्रतिक्रिया पाहता पाकिस्तानचा पवित्रा खराच ठरलेला दिसतो.

सईदच्या सुटकेनंतर व्हाईट हाऊसची अगदीच कोमट प्रतिक्रिया पाहता पाकिस्तानचा पवित्रा खराच ठरलेला दिसतो. सईदसारख्यांना प्रत्यक्ष टाचेखाली ठेवण्यापेक्षा ‘मोकळे’ सोडणे हे जास्त ‘फायद्याचे’ आहे हे न समजण्याइतके पाक प्रशासन भाबडे नाही. त्यावेळी अटक ‘दाखवणे’ गरजेचे होते, ती त्यांनी दाखवली, आता सोडून दिले!पंतप्रधान मोदींच्या कूटनीतीचे यश, भारत-अमेरिका संबंधातील नवे आशादायी ट्रम्प-मोदीपर्व असं म्हणत हाफिज सईदच्या नजरकैदेचे मोठे गुणगान उतावीळ समाजमाध्यमांनी यावर्षीच जानेवारीत केले होते. वस्तुत: ते तसे नव्हतेच हे हाफिज सईदच्या सुटकेने पुन्हा एकवार सिद्ध केले आहे. खुद्द हाफिज सईदने अटक झाल्यावर व्हिडीओ शूट केला होता आणि त्यात असे म्हटले होते की, ‘मला अटक होतेय, त्याला ट्रम्प आणि मोदी यांची ‘गहरी दोस्ती’ जबाबदार आहे. केवळ भारताला खूश करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तान सरकारवर दबाव आणला. काश्मीर आणि बलुचिस्तानप्रश्नी भारताचा दबाव आणि त्याला अमेरिकेची साथ म्हणून मला अटक केली जाते आहे.’ आणि आपल्याकडे समाजमाध्यमातल्या भक्तगणांनी भारतासह मोदींच्या कर्तबगारीचे कौतुकपोवाडे गायला सुरुवात केली.मात्र पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचे सारे श्रेय असे मोदी आणि ट्रम्प दोस्तीला देऊन टाकणे म्हणजे या घटनेकडे हाफिज आणि पाकिस्तानने दाखवलेल्या चष्म्यातूनच पाहण्यासारखे आहे हे तेव्हाच पुरेसे स्पष्ट होते. वॉशिंग्टनचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे हे ओळखून गेली काही दशके सतत त्या दिशेनेच पाठ फिरवणाºया पाकिस्तान सरकारच्या मुरब्बी राजकारणाची ही एक खेळी होती. त्या खेळीचा पुढचा भाग पाकिस्तानने आता खेळला आहे.मुळात ट्रम्प प्रशासन पाकिस्तानला चांगले धारेवर धरेल आणि पाकिस्तान सरकारच्या नाड्याच आवळल्या जातील असे वाटणे हाच एक भाबडेपणा होता. प्रत्यक्षात तसे घडणार नव्हते. घडलेही नाही. अमेरिकन रसदीवर जगणाºया पाकिस्तानविषयी ट्रम्प यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी अनेक अपमानास्पद अनुद्गार काढले आहेत. सत्तेत येताच त्यांनी सात मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली. आणि ती करताना अन्य देशांकडे अर्थातच पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देशही केला. आणि आपण कसे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढ्यात सहभागी आहोत. ज्याला संयुक्त राष्टÑसंघ आणि अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले आहे त्या सईदच्या कशा आम्ही मुसक्या बांधल्या हे दाखविण्यासाठी नजरकैदेचा फार्स पाकिस्तानने केला. त्याचे कैदेत असणे म्हणजे भारतीय कूटनीतीचा विजय आहे असे मानणेच खरे तर भोळसटपणाचे होते. उलट नजरकैदेत असल्याने हाफिज सईद कसा कशातच सहभागी (असू शकत) नाही असे म्हणत पाकिस्तान त्याला आणि त्याच्या संघटनेच्या कृत्यांना एक सुरक्षाकवचच पुरवत होते.आता पाकिस्तानच्या हे लक्षात आले आहे की याला कैदेत ठेवून याच्या नाकदुºया काढत बसण्यापेक्षा त्याला मोकळे सोडलेले बरे. कारण तो कैदेत नसला म्हणून काही व्हाईट हाऊसमधून इस्लामाबादला खलिता येणार नाही. माहौल ‘ठंडा’ आहे. हाफिज सईद तेव्हा नजरकैदेतही बंदी नव्हता, आता तर ‘मोकाट’च आहे. यश तेव्हाही भारतीय कूटनैतिक आघाडीचे नव्हतेच, धोका तेव्हाही होता, आजही आहेच.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद