शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

प्रापंचिक दृष्टिभ्रम

By admin | Updated: January 12, 2015 01:22 IST

अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत.

कुमुद गोसावी - अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत. मात्र कधी कधी या उजेडातून जाणारी वाट जिथं संपते तिथं होतो दृष्टिभ्रम! मग ‘आपुलाचि आपण करीसी संवाद’ अशी मनोवस्था होते. मनाच्या विभ्रमात अडकल्यानं सत्याची कास सुटते. मन मृगजळामागे धावतं.शेतकरी आपल्या पिकाचं रक्षण व्हावं म्हणून शेतात बुजगावणं उभारतो, ते पक्ष्यांचा दृष्टिभ्रम व्हावा म्हणून! स्वत:च्या बुद्धिचातुर्याचाच हा उपयोग! विद्वत्तेच्या अहंकारानं माखलेल्या कविकुलगुरू कालिदासाला प्रवासात एकदा तहानेनं व्याकुळलेल्या अवस्थेत एका झोपडीत पाणी मागण्यासाठी जावं लागलं. तिथं स्वत:चा परिचय एका मुलीला तिनं विचारलं म्हणून, ‘मी एक प्रसिद्ध, बलवान मानव आहे’, असं उत्तर देताच ती मुलगी म्हणाली, ‘जगात दोनच बलवान आहेत - एक अन्न व दुसरं पाणी.’ मुलीचं उत्तर अचूक असल्याचा अनुभव कालिदास तहानेनं तडफडताना घेतच होता.कालिदास वरमला. आपण ‘वाटसरू’ आहोत असं सांगताच मुलीनं सांगितलं, ‘वाटसरू तर दोनच आहेत - एक सूर्य नि दुसरा चंद्र! जे अथकपणे मार्ग आक्रमित असतात! तुम्ही तर थकलेले दिसताय!’ एवढं बोलून ती तेथून निघून गेली. घशाला लागलेली कोरड कालिदासाला जणू जाणीव करून देत होती की, ‘अन्नपाण्याशिवाय आपण बलहीन ठरतो. विद्वत्ता नि व्यवहार यात फरक असतो तर!’ एक वृद्धा पाण्याची घागर घेऊन येताना दिसताच कालिदास मोठ्या आशेनं तिच्याकडं झेपावत, तिनं काही विचारायच्या आत म्हणाला, ‘आई, मी अतिशय तहानलेला पाहुणा आहे!’ त्यावर ती वृद्धा म्हणाली, ‘बेटा संसारात पाहुणे तर दोनच! एक धन व दुसरं तारुण्य. तेव्हा तू खरं सांग, तू कोण आहेस?’ पाण्याविना अंत होऊ नये म्हणून कालिदासानं सांगितलं, ‘मी सहनशील आहे.’ त्यावर ताडकन वृद्धेनं सुनावलं, ‘स्वत:ला विद्वान समजतोस नि असत्य बोलतोस. अरे! सहनशील तर दोनच! एक झाड, जे कुऱ्हाडीचे घाव सोसून माणसाला फळंच देत राहतात, सावलीत घेतात नि दुसरी पृथ्वी! तिचं पोट फाडून बी पेरलं तरी ते रुजवून अंकुरते, धान्य देते!’ हताश होऊन कालिदास शेवटी डोळ्यांत प्राण साठवून अगतिकतेनं म्हणतो, ‘आई, मी मूर्ख आहे.’ त्यावर वृद्धा म्हणते, ‘या दुनियेत दोनच मूर्ख आहेत! एक राजा व दुसरा पंडित. राजाला स्वस्तुती आवडते नि पंडिताला ती नाहक करावीशी वाटते. या दोघांएवढे कोण मूर्ख आहे, हे आता तूच सांग पाहू?’ कालिदासाचा अवघा अहंकार गळून पडला, दृष्टिभ्रमाचा पडदा दूर झाला! नाही का? याचि देही याचि डोळा । भोगीन मुक्तीचा सोहळा ।। असा अहंतारहित आनंदानुभव कोणाला नकोय?