शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिल्याने येत आहे रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 00:09 IST

आपण सर्वांनी ऐकलं आहे ‘केल्याने होत आहे रे...’ परंतु आज मी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘‘दिल्याने येत आहे रे आधी दिलेची पाहिजे’’ हे महावाक्य आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला, उमजला आणि तुमच्यामध्ये रुजला तर तुमच्यामध्ये सुख नांदणारच.

- प्रल्हाद वामनराव पैआपण सर्वांनी ऐकलं आहे ‘केल्याने होत आहे रे...’ परंतु आज मी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘‘दिल्याने येत आहे रे आधी दिलेची पाहिजे’’ हे महावाक्य आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला, उमजला आणि तुमच्यामध्ये रुजला तर तुमच्यामध्ये सुख नांदणारच. आता तुम्हीच विचार करा तुमच्याकडे जर सुख नसेल तर तुम्ही देण्यामध्ये कमी पडत आहात. हे वाचल्यावर तुमच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. देणं इतकं महत्त्वाचं आहे? का दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? किती दिलं पाहिजे? कसं दिलं पाहिजे? खरंतर दररोजच्या जीवनामध्ये ‘देणीघेणी’ सुरू असतातच. उदाहरणार्थ लग्नामध्ये, बारशाला, मुंजीसाठी किंवा काही इतर कारणासाठी आपल्याकडे काही भेटवस्तू, अहेर आला की आपण ते लिहून ठेवतो आणि आपल्याला जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा तो व्यवहार लक्षात घेऊन देतो. आपण एखाद्याच्या घरी गेलो तर त्यांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्याला काय दिलं ते बरोबर लक्षात ठेवून ती व्यक्ती आपल्या घरी येते तेव्हा अगदी तसाच व्यवहार पूर्ण करतो. कमी नाहीच पण जास्तसुद्धा नाही. याला देणं म्हणत नाहीत. खरं ‘देणं’ पाहायचं असेल तर निसर्गाकडे पाहायचं. निसर्ग फक्त देतच असतो. सूर्य सर्वांना प्रकाश देतो. झाडांकडे पाहिल्यावर मला कौतुकच वाटतं, आपल्याला प्राणवायू तर देतातच शिवाय पानं, फुलं, फळं सर्वांसाठी देतात. आंब्याच्या झाडाला इतके आंबे येतात, त्यातल्या एकाही आंब्याची झाड चवदेखील चाखत नाही. सर्व आंबे आपल्यासाठी देत असतं. तुम्ही विचार करत असाल, तुम्ही म्हणताय खरं परंतु आमच्याकडेच नाही, आमचंच भागत नाही, दररोजच्या व्यवहाराची सांगत घालताना नाकीनऊ येतात; त्यात तुम्ही कुठे देण्याच्या गोष्टी करता आहात. घेण्याच्या काही गोष्टी असतील तर त्या आम्हाला आधी सांगा. खरंतर मी घेण्याचीच गोष्ट शिकवितो आहे. आपण कॅरम खेळत असतो तेव्हा दोन प्रकारचे शॉट्स असतात. एक होम शॉट आणि दुसरा रिबाउंड शॉट. मी आता जे सांगतो आहे ‘‘दिल्याने येतं आहे रे’’ हा रिबाउंड शॉट आहे. कॅरमच्या खेळामध्ये होम शॉट सोपा असतो आणि रिबाउंड शॉट कठीण असतो, पण जीवनामध्ये होम शॉट अवघड असतो तर रिबाउंड शॉट सोपा असतो. हे नेमकं कसं ते पुढील लेखात समजून घेऊया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या