शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

५७ व्या वर्षीही मी खूप हॉट दिसतो, याचं रहस्य साधं आहे! - मिलिंद सोमण

By संदीप आडनाईक | Updated: December 26, 2022 08:55 IST

शारीरिक कष्ट नाहीत. गाड्या, कपडे, खाण्या-पिण्याची चैन; यामुळे ऐदी होऊ नका! बदला! आपल्या शक्तीचा, शरीराचा वापर करा, नाही तर एक दिवस ते नष्ट होईल!

- मिलिंद सोमण, ख्यातनाम अभिनेता, मॉडेल

(शब्दांकन : संदीप आडनाईक उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर)

मी सध्या सायकल चालवत मुंबई ते मंगळूर अशी ग्रीन राइड करतो आहे. ८ दिवसांत १० शहरांमधून १४०० किलोमीटर अंतर पूर्ण करेन. मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोल्हापूर, बेळगाव, शेगाव, हिरेबेन्नूर, तुमकुरू, म्हैसूर, मंगळूर ही शहरं माझ्या वाटेत आहेत. आत्तापर्यंत मी १००० किलोमीटरची ग्रीन राइड पूर्ण केली आहे, मनात आणलं तर कुणालाही हे सहज जमेल. त्यासाठी शरीर-मनाची तंदुरुस्ती मात्र महत्त्वाची!

मला लहानपणापासून व्यायामाची आवड.  तेराव्या वर्षी मी २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण केली. माझी आई वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील खूपच फिट आहे. ती प्राध्यापक होती. आजही काठी न वापरता ट्रेकिंग करते. हिमालयात गेली. नागालँडमध्ये आत्ताच जाऊन आली. यापूर्वी तीही सायकलिंग करत असे. व्यायामासाठी वय महत्त्वाचे नाही.

या वयातही माझा फिटनेस इतका उत्तम कसा, याबाबत अनेकजण मला विचारतात. माझ्या फिटनेसचं रहस्य काय? - तर माझं असं कोणतंही रुटीन नाही, विशिष्ट प्रकारचं डाएट नाही, मी कोणतीही सप्लिमेंट‌्स घेत नाही. मी इतरांपेक्षा वेगळं काही खात नाही. वेळ मिळेल तसा व्यायाम मात्र करतो. खरं तर दोन-दोन तास जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची, खूप घाम गाळण्याचीही गरज नाही. आपल्याला शक्य आहे, तितका वेळ व्यायाम करा. सूर्यनमस्कार घाला, उठाबशा काढा, जागच्या जागी उड्या मारा; पण हे सगळं रोज करा. आपल्यातला कमकुवतपणा शोधा. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला पाहिजे, वर्षातून एकदा तरी सायकलिंग केलं पाहिजे. आपल्यातला आळशीपणा मारा आणि प्रदूषण करू नका, हा माझ्या या ग्रीन राइडचा हेतू आहे. सध्या लोक आळशी झाले आहेत. शारीरिक कष्ट नाहीत. मोबाइल, गाड्या, कपडे, खाद्यपदार्थ याची चैन सुरू आहे. यामुळे आपण ऐदी झालो आहोत. ते बदला, त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावरही होत आहेत. आपल्या शक्तीचा, शरीराचा वापर करा, नाही तर एक दिवस ते नष्ट होईल.  स्वत:च्या मनाला, शरीराला आव्हानं देण्याची मला आवड आहे. त्याचा फायदा होतो.

माझ्या सेक्स अपीलबद्दल अजूनही चर्चा होते. लोक त्याबद्दल बोलत असतात. आज माझं वय ५७ आहे, तरीही मी खूपच हॉट दिसतो, असं लोक म्हणतात! - ते खरंही आहे म्हणा! पण  मी लोकांचं म्हणणं फार मनावर घेत नाही. त्याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या सेक्स लाइफमध्ये लोकांना फार भोचक रस असतो, हेही मला माहिती आहे. असो बापडा!  मी अंकिताशी लग्न केलं तेव्हा ५३ वर्षांचा होतो आणि अंकिता माझ्यापेक्षा २६ वर्षांनी लहान! पण  मी तिच्याच  वयाचा वाटतो; कारण आमच्या नात्याचा ताजेपणा! आपली नाती जर अशी मोकळी ढाकळी आणि आनंदी असतील तर त्याचा शरीराच्या आणि मनाच्याही स्वास्थ्यावर उत्तम परिणाम होतो. 

मी कायदा पाळणारा माणूस आहे. मी कायद्याच्या बाहेर वागत-बोलत नाही. सोशल मीडियावर जे काही लिहितो, ते जबाबदारीने, भान ठेवून. त्यामुळे दीपिकाच्या बिकिनीबद्दलचं माझं मत असो, नाहीतर रणवीर सिंगबद्दल असो; मी जे लिहितो; ती माझी मतं आहेत... आणि मी व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतो. तो सर्वांनीच करायला हवा! - बाकी माझ्याबद्दल लोक काय बोलतात, त्याकडे मी तरी दुर्लक्षच करतो!

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Milind Somanमिलिंद सोमण