शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिया आणि प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 06:07 IST

क्रिया तशी प्रतिक्रिया. आपली जशी क्रिया तशी समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया.

क्रिया तशी प्रतिक्रिया. आपली जशी क्रिया तशी समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया. किंवा समोरच्याची जशी क्रिया तशी आपली प्रतिक्रिया. क्रिया-प्रतिक्रिया हा सृष्टीचा-निसर्गाचा अपरिहार्य असा नियमच आहे. आपण लोकांशी जसे वागतो, अगदी तसेच हुबेहूब आरशातल्या प्रतिबिंंबाप्रमाणे लोकसुद्धा आपल्याशी वागतात. तुम्ही लोकांचा अपमान केल्यास लोकही तुमचा अपमान करतील आणि तुम्ही सन्मान केला तर ते सुद्धा सन्मान करतील. तुम्ही लोकांना शिव्या घातल्या तर लोकसुद्धा तुम्हाला शिव्याच घालतील आणि लोकांची स्तुती केल्यास लोकही तुमची स्तुती केल्यावाचून राहणार नाहीत. जसा ध्वनी तसा प्रतिध्वनी उमटतो. किंवा इकडे ‘कड कट्ट कड’ झाले की पलीकडेसुद्धा ‘कड कट्ट कड’ झालेच पाहिजे., असा ध्वनिशास्त्राचा, मानसशास्त्राचा अपरिहार्य नियम, सिद्धान्त किंवा परिणाम आहे! तुमच्या मनात जशा सद्भावना किंवा दुर्भावना ज्या ज्या व्यक्तीबद्दल असतील, अगदी तशाच सद्भावना किंवा दुर्भावना तुुमच्याबद्दल त्या त्या व्यक्तीच्याही मनात अपरिहार्यपणे निर्माण झाल्यावाचून राहाणार नाहीत! जो इतरांची टिंगल-टवाळी करतो किंवा कुचेष्टेने हसतो विशेषत: आंधळ्यापांगळ्यांची किंवा मुक्याबहिऱ्यांची, दिनदुबळ्या गरिबांची टिंगल-टवाळी करतो, त्यांच्या दुबळेपणावर, दोषावर किंवा त्यांच्या व्यगांवर विकट हास्य करतो अशा माणुसकीहीन व्यक्तीवरही हीच वेळ सर्वसाक्षी परमेश्वर लवकरच आणतो हे पक्के ध्यानात ठेवावे. म्हणून स्वत:ला अप्रिय किंवा हानीकारक वाटेल असे विचार, आचार आपणही दुसऱ्याबाबत कदापिही ठेवू नयेत व तसे मनातसुद्धा आणू नयेत. दुसऱ्याने जरी आपल्याबाबत वाईट, अप्रिय किंवा हानीकारक विचार केला तरीसुद्धा आपण त्याच्याबाबत चांगलाच विचार करावा, कारण हेच खरे सुखी होण्याचे व आयुष्याचा, जीवनाचा चांगला उपयोग करण्याचे एकमेव रहस्य आहे. म्हणूनच नेहमी चांगला विचार करावा, चांगलाच आचार ठेवावा. चांगलेच बोला अन् चांगले होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. -प्रा.डॉ. सुभाष पवार