शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अ‍ॅसिड हल्ल्याची धग

By admin | Updated: September 13, 2016 00:30 IST

सूड भावना आणि एकतर्फी प्रेमातून प्रीती राठी नावाच्या तरुणीवर अत्यंत क्रूरपणे अ‍ॅसिड हल्ला करून तिचा जीव घेणारा नराधम अंकुर पनवार याला सत्र न्यायालयाने मृत्युदंड ठोठावून समाजातील

सूड भावना आणि एकतर्फी प्रेमातून प्रीती राठी नावाच्या तरुणीवर अत्यंत क्रूरपणे अ‍ॅसिड हल्ला करून तिचा जीव घेणारा नराधम अंकुर पनवार याला सत्र न्यायालयाने मृत्युदंड ठोठावून समाजातील अशा सैतानी वृत्तीला कदापि क्षमा मिळणार नाही, त्यांना आपल्या अमानुष कृत्याची शिक्षा भोगावीच लागेल, हे अधोरेखित केले आहे. दिल्लीतील २०१२ च्या निर्भया हत्याकांडानंतर भारतीय दंड संहितेमध्ये महिलांवरील बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्यांबाबत काही कठोर तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्याआधारे बहुदा प्रथमच अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या पीडितांना नुकसान भरपाई, त्यांचे पुनर्वसन तसेच मोफत उपचाराचीही व्यवस्था या कायद्यात करण्यात आली आहे. त्यासोबतच हे खटले तातडीने निकाली काढण्याचेही प्रयत्न न्यायालयाकडून होत आहेत. परंतु या सर्वांमुळे अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी अ‍ॅसिड हल्ले मात्र थांबलेले नाहीत, हे वास्तवही स्वीकारावेच लागेल. सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅसिड विक्रीवर प्रतिबंध घातले असतानाही बाजारात सहजपणे उपलब्ध होणारे अ‍ॅसिड हे सुद्धा यामागील महत्त्वाचे कारण आहे. (आरोपीने राजधानी दिल्लीत अ‍ॅसिड खरेदी केले होते) नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१५ मध्ये देशभरात अ‍ॅसिड हल्ल्यांचे एकूण ३४९ गुन्हे नोंदविण्यात आले. मागील पाच वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. २०१० साली ५७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या अ‍ॅसिड हल्ल्यांना बळी ठरणाऱ्या ८५ टक्के महिला आणि प्रामुख्याने तरुणी आहेत. एखाद्या व्यक्तीला समाजातून आणि जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा हा अत्यंत घृणास्पद असा मार्ग आहे. या गुन्ह्यांना कुठेतरी पुरुषी मानसिकताच कारणीभूत आहे, यात दुमत असू नये. प्रीतीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्यावर ३० दिवस ती प्राणांतिक वेदनांनी तडफडत होती. तिची दृष्टी गेली होती, स्वरयंत्र, श्वसन आणि अन्ननलिका निकामी झाल्या होत्या. अखेर तिने मृत्यूला कवटाळले. पण अशा हल्ल्यांमधून बचावलेल्या मुलींच्या वेदना जाणल्या की त्याची दाहकता आपल्याला कळते. समाजच नव्हे तर कुटुंबीयसुद्धा तिला या अवस्थेत स्वीकारण्यास कचरतात. ऐन तारुण्यात असताना जिवंतपणीच तिला मरणयातना सहन कराव्या लागतात आणि गुन्हेगाराला त्यातच असुरी आनंद मिळत असतो. त्यामुळे या प्रकरणात आरोपीचे कृत्य अत्यंत अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण अगदी योग्य आहे