शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संचित : ‘ठिणगी’ जिवंत राहावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 03:55 IST

अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..

- चेतन भगत

आयुष्यातले काही दिवस असे असतात, जेव्हा तुम्ही खरोखरच खूप खुश असता, आनंदी असता. एका अनोख्या अशा मस्तीत आपण जगत असतो. त्याचवेळी भविष्यातली स्वप्नंही आपल्या मनात रेंगाळत असतात. हे दिवस असतात, कॉलेजचे दिवस. आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असा हा काळ. तुम्ही कोण आहात, भविष्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी असाल, कोणती उंची तुम्ही गाठाल, हे सर्व ठरतं ते याच दिवसांत.अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..कुठून होते या ठिणगीची सुरुवात? खरं तर आपल्या जन्मापासूनच ती आपल्यासोबत असते आणि पुढेही आयुष्यभर राहते. या ठिणगीचा तुम्ही कसा वापर करता, यावर भविष्यात तुम्ही कुठे उभं असाल हे ठरतं. जेव्हा मी तरुणांकडे पाहतो, तेव्हा त्यांच्यात मला ऊर्जा ठसठसून भरलेली दिसते. याच्या अगदी उलट म्हणजे वय झालेली लोकं. त्यांच्यात ना कुठली ऊर्जा दिसते, ना इच्छाशक्ती. याचाच अर्थ जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं आपल्यातलं चैतन्य हरवायला लागतं. त्यासाठीच हे चैतन्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं. आपल्यातली ही ऊर्जा वाचवायची आणि वाढवायची कशी? - ही ऊर्जा म्हणजे जणू दिव्याची ज्योत. ती कायम पेटती राहायला हवी असेल तर तिचं संगोपन करावं लागतं, काळजी घ्यावी लागते, वारा, वावटळापासून तिला वाचवावं लागतं. सतत इंधन पुरवत राहावं लागतं. ही ऊर्जा आणि इंधन आपल्याला मिळतं ते ध्येयामुळे. ते उत्तुंग असलं, तर म्हातारं होण्याचं तुम्हाला भय नाही. अनेकजण कालांतरानं आपली ऊर्जा फक्त पैशासाठी वापरायला लागतात; पण पैसा हेच आयुष्यात सर्वस्व नाही. तसं असतं, तर जगातल्या मोठमोठ्या, श्रीमंत लोकांना क्रियाशील राहण्याची गरजच पडली नसती.