शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 5:59 AM

भूकंपरोधक इमारती बांधता येतात; पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र लोकांचे जीव वाचू शकतात.

३० सप्टेंबर, १९९३चा दिवस आठवतो. गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. सकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक हादरे जाणवत होते, काय अघटीत घडले ते कळत नव्हते, लोक भयभीत झाले होते. मी त्या वेळेस भगवती कॉलनी, औरंगाबाद (आजचे छ. संभाजीनगर) येथे राहत होतो. नंतर कळले की हा भूकंप आहे. महाराष्ट्राने असा मोठा भूकंप पहिल्यांदाच अनुभवला असावा. हा भूकंप ६.३ रिक्टरचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू ७० कि.मी. सोलापूरच्या ईशान्येला होता. सुमारे ९७०० लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले व तीस हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. 

भूकंपाबद्दल सांगायचे झाले तर भारताचा प्रभाग हा चार भूकंपप्रवण विभागात विभागला गेला आहे. झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५ अशा भूकंपप्रवण क्षेत्रात आपला देश विभागला आहे . झोन २ हा कमी तीव्रतेचा, तर झोन ५ हा सर्वांत जास्त तीव्रतेचा प्रभाग असतो. भूकंपप्रवण क्षेत्र ५ मध्ये भूकंप आल्यास तिथे जास्त हानी पोहोचते. साधारणतः भूकंपाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डीप फोकस अर्थक्वेक आणि दुसरा शॅलो फोकस अर्थक्वेक. डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे जमिनीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही ३० किलोमीटरपेक्षा जास्त खोलवरून येते व जमिनीला जबरदस्त हादरे बसतात, तर शॅलो फोकस अर्थक्वेक यामध्ये जमिनीतून येणारी ऊर्जा ३० किलोमीटर पेक्षा कमी खोलवरून येते. जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेमुळे अतिवेगवान लहरी निर्माण होतात व जमिनीची जोरदार हालचाल होते. भूकंपाचे भाकीत करता येत नाही. जर्मन शास्त्रज्ञ वेगेनर यांनी भूकंपाबद्दल निश्चित सांगता यावे म्हणून सुमारे ३० वर्षे सतत भूकंपाचा अभ्यास केला व त्यानीही सांगितले की भूकंप अनिश्चित असतो. म्हणूनच भूकंपप्रवण क्षेत्रात इमारतीची संरचना संकल्प चित्र तयार करताना भूकंपशास्त्राचा अभ्यास अत्यावश्यक आहे. भूकंपरोधक इमारती बांधता येतात, पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही, कारण भूकंपाबद्दल किती मॅग्निट्यूडचा भूकंप येईल हे भाकीत करता येत नाही. परंतु, ‘अर्ली वॉर्निंग सिस्टम’मुळे वेळीच लोकांना सूचित केले जाते. त्यामुळे लोकांचा जीव वाचू शकतो. ३ ते ५ रिश्टरचा भूकंप असेल तर फारशी हानी होत नाही व घरेही पडत नाहीत. ५ ते ६ रिश्टरचा भूकंप असेल तर लोड बेअरिंग घरे पडायला लागतात. ६ ते ८ रिश्टरचा भूकंप असेल तर आरसीसी/काँक्रीटची घरे पडायला लागतात. ८ ते ९ रिश्टर भूकंप जास्त विनाशकारी असतो.भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपाची मानके गृहीत धरूनच इमारतीची संरचना, संकल्पचित्रे केली पाहिजेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीचे सर्व ओझे हे कॉलमवर येत असल्यामुळे ते त्या-त्या प्रमाणात व आवश्यकतेनुसार जाड असावेत. कॉलम हे इमारतीचे पाय असतात, ते मजबूत हवेत हाच भूकंप रोधक संरचना संकल्प चित्राचा मुख्य गाभा असतो. 

किल्लारीच्या भूकंपात मुख्यत्वे दगडांनी, विटांनी बांधलेली घरेच पडली, तुटली पण आरसीसीचे एकही घर या भूकंपात पडले नाही. विशेष म्हणजे खुद्द किल्लारीत असलेले नीळकंठेश्वराचे व दगडांनी बांधलेल्या इतर दोन-तीन मंदिरांना काहीही झाले नाही. कारण त्यामध्ये त्यावेळचे मिस्त्री यांनी भूकंप रोधक मंदिर बांधल्याचे दिसते. कारण त्यामध्ये बॉंड स्टोन, थ्रू स्टोन, कॉर्नर स्टोन, ओव्हर लॅप हे व्यवस्थित असल्याचे आताही दिसून येते. किल्लारीच्या भूकंपाच्या घटनेला आज ३० सप्टेंबर, २०२३ला बरोबर ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा भूकंप अनुभवला तो कोणताही माणूस या भूकंपाची आठवण कदापि विसरू शकणार नाही.

- प्रा. डॉ. राजाराम दमगीर, भूकंपशास्त्राचे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर 

टॅग्स :laturलातूरKillari Earthquakeकिल्लारी भूकंप