शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शस्त्रक्रिया टाळून वाचविला तरुणाचा जिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:28 IST

हिरे वैद्यकीय महाविद्यालय : कोरोनासह इतरही रुग्णांवर प्रभावी उपचार

धुळे : अपघातात जखमी झालेल्या एका तरुण कामगारावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असताना हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टराना शस्त्रक्रिया न करता या तरुणाचा जिव वाचविण्यात यश आले आहे़ कोरोना बाधित रुग्णांसह इतरही रुग्णांवर प्रभावीपणे उपचार सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करीत डॉक्टरांचा सत्कार केला़येथील रामशरण पांडे (३०) या तरुण कामगाराला जेसीबी यंत्रावर काम करताना १८ मे रोजी अपघात झाला होता़ या दुर्घटनेत त्याचा हात मोडला आणि छातीला तसेच पोटाला मुका मार लागला होता़ दोन खाजगी डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचार करण्यात आले़ परंतु नंतर उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सोनाग्राफी करण्यात आली़ अपघातात पोटाला मुका मार लागल्याने त्याच्या लिव्हरला मोठी चिर पडल्याची धक्कादायक बाब समोर आली़ लिव्हरमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता़ मार इतका गंभीर होता की लिव्हरला पडलेली चिर पोटातील महाशिरेपर्यंत गेली होती़मोठ्या दवाखान्यात उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला़ परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य नव्हते़ त्यामुळे डॉ़ सुधाकर गुजराथी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ परवेझ मुजावर यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात या तरुणाला दाखल केले़ रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले़ परंतु मार खोलवर असल्याने पोटाची शस्त्रक्रिया करणे धोकेदायक ठरु शकते़ म्हणून शस्त्रक्रिया टाळून उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांनी आणि त्यात त्यांना यशही आले़ हिरे मेडीकलच्या डॉक्टरांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर योग्य उपचार करुन रामशरणचा जिव वाचवला़हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या या उपचाराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कौतुक केले असून अधीष्ठाता डॉ़ पल्लवी सापळे, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ़ परवेझ मुजावर, डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़ सुधाकर गुजराथी यांच्यासह संपूर्ण टीमचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला़ कोरोनासह इतरही रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याची दखल प्रशासनाने घेतली़

टॅग्स :Dhuleधुळे