धुळे : तू माझ्या गर्लफे्रन्डचे नाव का घेतो, असा जाब विचारत एका तरुणासह त्याच्या पाच मित्रांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी देवपुर बसस्थानकासमोर घडली़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच एकाला ताब्यात घेण्यात आले आहे़देवपुरातील पंचाळवाडा येथील राजेश भानुदास जाधव (३३) या तरुणाने देवपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, निखील सराफ याने दम देत तू माझ्या गर्लफ्रेन्डचे नाव का घेतो असा जाब विचारला़ या कारणावरुन भांडण सुरु झाले़ यानंतर त्याच्या सोबत असलेल्या अन्य पाच जणांनी हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात लाकडी दांडक्याचाही वापर झाला़ दांडक्याने डोक्यावर, पाठीवर, हातापायावर मारहाण करण्यात आली़ शिवीगाळ करीत धमकीही देण्यात आली़ हा सर्व प्रकार देवपूर बसस्थानकाच्या समोरील देशी दारुच्या दुकानासमोर रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला़ जखमी अवस्थेत राजेशला खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले़प्राथमिक उपचार केल्यानंतर देवपुर पोलीस ठाण्यात राजेश भानुदास जाधव याने रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार निखील सराफ, शुभम भामरे, ऋषभ, गौरभ उर्फ जम्ब्या नरोटे, अजय कांबळे, बंटी कांबळे (कोणाचेही पूर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा़ देवपूर) यांच्या विरोधात संशयावरुन भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३२६, ५०४, ५०६ यासह अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस हेड कॉन्स्टेबल बी़ बी़ बागुल घटनेचा तपास करीत आहेत़दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित निखील सराफ या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे़
तरुणाला मारहाण, ६ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:07 IST