धुळे : तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्घटना वाडीभोकर रोडवरील उत्तरमुखी मारुती मंदिर परिसरात घडली़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़देवपूर भागात वाडीभोकर रोडवर उत्तरमुखी मारुती मंदिराजवळ डॉ़ बोरकर यांचा दवाखाना आहे़ या दवाखान्याच्या पाठीमागे राहुल रविंद्र कुलकर्णी (२८) या तरुणाचे वास्तव्य आहे़ साईराम ट्रॅव्हल्सचा तो कर्मचारी होता़ या तरुणाने त्याच्या स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेतला़ ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़घटना लक्षात येताच त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी त्याला तपासून डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विनायक अरुण कुळकर्णी यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़पोलीस हेड कॉन्स्टेबल आय़ एऩ ईशी घटनेचा तपास करीत आहेत़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़राहुल याच्या पश्चात केवळ त्याची वृध्द आई आहे़ तो घरात एकुलता होता़ त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती़ त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचे कारण मात्र समोर येऊ शकलेले नाही़ पोलीस तपास सुरु आहे़
धुळ्यात गळफासाने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:14 IST