लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील तु. ता. खलाणे महाजन हायस्कूलमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'मासिक पाळी व्यवस्थापन' या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली़कार्यशाळेत स्मिता सराफ यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, त्या काळातील स्वच्छता, आरोग्य, आहारविहार, शोषके, अंधश्रद्धा आणि गैरसमज आदी विषयी चर्चा आणि मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत केवळ व्याख्यान न देता खेळ, चर्चा यांद्वारे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलींशी संवाद साधण्यात आला़ कार्यशाळेत मुुलींच्या विविध शंकांचे निरसन केले. कार्यक्रमात एम. आर. भांबरे, व्ही़ एम़ भामरे, एस़ आर महाजन, व्ही़ एम़ ठाकूर, बाविस्कर , भाग्यश्री माळी यांनी परिश्रम घेतले. आभार मनीषा ठाकूर यांनी मानले़
मासिक पाळी विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:45 IST