शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेचे काम निकृष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:04 IST

शिंदखेडा : विरोधक करणार जिल्हाधिकाºयांकडे तक्रार, गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील २१ कोटी खर्चाच्या मंजूर झालेल्या पाणी योजनेचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील चौधरी आणि गटनेते प्रा.सुरेश देसले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला. या कामाची चौकशी झालीच पाहिजे. शिवाय निकृष्ट काम पूर्णपणे पाडून त्याजागी नवीन काम झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.याबाबत नगरपंचायतचे कार्यकारी मुख्याधिकारी अजित निकत व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बहुचर्चित योजनाशिंदखेडा शहरासाठी बहुचर्चित अशी २१ कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम ठेकेदारामार्फत सुरू झाले आहे. तापी नदीवरील सुकवद पुलाजवळ असलेल्या बॅरेजमधून शहराला पाणीपुरवठा करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.या योजनेअंतर्गत शहरातील पाईपलाईनचे काम सुरू आहे. तसेच सुकवद येथे नदीकाठी पाण्याची इंटेक विहीर होत आहे. मात्र, या विहिरीचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. हाताने जरी कोरले तरी या विहिरीच्या कठड्याचे काँक्रीट सहज निघून येत असल्याचे सांगून विरोधी नगरसेवकांसह सुनील चौधरी आणि प्रा.सुरेश देसले यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. ही योजना शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.गेल्या तीस वषार्पासून शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत सर्वांच्या अथक प्रयत्नाने मिळालेली ही योजना गावासाठी वरदान ठरणार आहे. मात्र, या योजनेचे काम निकृष्ठ होत असल्याचे चित्र आहे. आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही मात्र, जी कामे होत आहे आणि होणार आहेत, ती चांगल्या दर्जाची झाली पाहिजे, अशी भूमिका आहे. आता या योजनेचे काम निकृष्ठ झाले आणि ही योजना भविष्यकाळात निकामी झाली तर जनता कुणालाही माफ करणार नाही. हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, याकडे सत्ताधाºयांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, सत्ताधारी या कामाच्या दर्जाकडे काहीही लक्ष देत नसल्याचा आरोपही प्रा.देसले यांनी केला. तसेच याबाबत जिल्हाधिकाºयांकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाची क्वॉलिटी कंट्रोलद्वारे चौकशी व्हावी आणि असे निकृष्ठ दर्जाचे काम काढून  त्याजागी नवीन चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी विरोधी पक्ष नेता सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, दीपक अहिरे, चंद्रकांत सोनवणे, ईद्रीस कुरेशी ,चंद्रकांत थोरात, किरण थोरात, आदी विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे