धुळे : एका महिलेची हरविलेली पर्स महिला पोलीस कर्मचारी मंगला भोई यांना सापडली़ चौकशी करुन त्या महिलेला तिची पर्स परत करत आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले़ या पर्समध्ये रोख रकमेसह महागडा मोबाईल होता़ या कृतीबद्दल कौतूक होत आहे़पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेली महिला पोलीस शिपाई मंगला भोई या सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नोकरीवर येत होत्या़ त्यांना देवपुरातील एकवीरा देवी मंदिर परिसरात एका दुचाकीवरुन एक महिला आणि एक युवती अशा दोघी क्रॉस झाल्या़ त्यातील महिलेची पर्स खाली पडल्याचे भोई यांना दिसले़ मंगला यांनी ही पर्स उचलली आणि त्या दुचाकीवरील दोघींना आवाज देवून थांबविण्याचा प्रयत्न केला़ एवढेच नव्हेतर त्या दोघींच्या पाठीमागे जावून त्यांना थांबविण्याचा देखील प्रयत्न केला़ मात्र, त्या दोन्ही दुचाकीवरुन वेगात देवपुरातील वाडीभोकर रोडवरील नेहरु नगरच्या दिशेने निघून गेल्या़यानंतर पोलीस कर्मचारी मंगला भोई यांनी पोलीस मुख्यालयात येवून महिलेची पर्स सापडल्याची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली़ तसेच त्या पर्सच्या मालकीन असलेल्या मेघा ललित चौधरी (रा़नाशिक) यांच्याशी त्या मोबाईलवरुन संपर्क साधला़ त्यांना पोलीस मुख्यालयात बोलावून घेतले़ त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांची हरविलेली पर्स आणि त्यांचा मोबाईल आणि पर्समध्ये असलेली रोख रक्कम त्यांच्याकडे सुपुर्द केली़ पोलीस कर्मचारी मंगला भोई यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मेघा चौधरी यांनी समाधान व्यक्त केले़ त्यांचे आभार देखील मानले़नाशिक येथील मेघा ललित चौधरी ही महिला जुुने धुळे येथील सुभाष नगरात राहणाºया तिच्या मामाकडे आली होती़ बहिणीला क्लासला सोडवायचे म्हणून त्या निघाल्या होत्या़ क्लासला जात असताना एकवीरा देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी त्या थांबल्या आणि त्यानंतर वेगाने वाडीभोकर रोडवरील नेहरु नगराच्या दिशेने त्या रवाना झाल्या़
महिलेची हरविलेली पर्स महिला पोलिसाकडून परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:17 IST