शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अल्पवयीन दोन मुलींसह एका महिलेले घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:01 IST

धुळे बसस्थानक : अहमदाबाद येथून धुळे मार्गे पुण्याला जाण्याचा होता बेत

धुळे : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून महाराष्ट्रातील पुणे येथे अल्पवयीन दोन मुलींना घेऊन जाणाºया टोळीचा धुळे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ दोन मुलींसह त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ ही घटना धुळे येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, मुली हरविल्याची तक्रार अहमदाबाद येथील वाजळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ अहमदाबाद शहरातील दोन उच्चभू्र घरातील मुलींना दहाव्या इयत्तेत गुण कमी मिळाले़ त्यांचे पालक त्यांना रागविले होते़ त्याचा राग आल्याने त्या दोन्ही मुलींनी घरातून पळून जाण्याचे ठरविले़ घरातून पैसे घेऊन गोवा येथे पळून जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आल्या़ मुलींची विक्री करणाºया टोळीची नजर त्यांच्यावर पडली़ त्यानंतर १८ तारखेला रात्री तीन महिला त्या दोन्ही मुलींना रिक्षात बसवून बसस्थानकात घेऊन गेल्या़ याचे सीसीटीव्ही कॅमेराचे काही फुटेज अहमदाबाद येथील पोलिसांच्या हाती लागले आहेत़ त्यानंतर तीन पैकी दोन महिला सुरत येथे उतरल्या़ तपास करीत असतानाच अहमदाबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन्ही महिलांना ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी संशयित गिता भानुदास निकम (२३, रा़ खंडोबावाडी, ता़ राहुरी) हिच्यासोबत धुळे बसमध्ये बसविल्याचे सांगितले़ त्यानंतर ते पुणे येथे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना चौकशीवेळी दिली़ धुळे पोलीस सज्जसुरत येथून एक महिला दोन मुलींना घेऊन धुळ्याकडे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, कर्मचारी योगेश चव्हाण, तुषार मोरे, राहुल गिरी, रणजित वळवी, माया ढोले, वंदना वाघ, सुशीला वळवी यांनी शहर बसस्थानकाच्या आवारात सापळा लावला़ मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पुणे येथे जाणाºया बसच्या समोर पोलिसांना दोन मुली आणि एक महिला संशयितरित्या फिरतांना आढळून आल्या़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवी-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली़ या मुली आणि महिला त्याच असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़ तोपर्यंत मुलींचेही पालक पोलीस ठाण्यात पोहचले होते़ अहमदाबादचे पोलीस येणारयाप्रकरणी तपासासाठी अहमदाबाद येथून पोलीस धुळ्यात येणार आहेत़ त्यानंतर या मुली आणि महिलेला सुरत येथील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ रॅकेट असण्याची शक्यतामुलींची विक्री करुन पैसे कमविण्याचा त्यांचा हेतू असावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे़ सुरत येथील रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या दोन महिलांच्या मोबाईलमध्ये संशयास्पद माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे़ या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु झाला आहे़ मात्र, अहमदाबाद येथील पोलीस आल्यानंतरच बºयाच बाबींचा उलगडा होणार असल्याचे स्पष्ट आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी