शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

स्त्रीस वस्तू म्हणून न गणता मानाचे स्थान मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:13 IST

शिंदखेडा एम.एच.एस.एस. महाविद्यालय : महिला व युवती जागर कार्यशाळेत निघाला सूर

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविद्यालयात महिला व युवती जागर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्त्रीस वस्तू म्हणून न गणता तिला मानाचे स्थान मिळावे असा सूर कार्यशाळेतून निघाला.आजच्या महिला शिक्षित झाल्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात स्त्रीचे समाजामध्ये असलेले स्थान आजही दुय्यम आहे. विशेषता ग्रामीण भागामध्ये हे चित्र आजही ठळकपणे पाहायला मिळते. त्यामुळे स्त्रीला समाजामध्ये वस्तू म्हणून न गणता तिलाही मानाचे स्थान मिळावे, असा सूर येथील एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महिला व युवती जागर कार्यशाळेत काढण्यात आला. या कार्यशाळेत महाविद्यालयातील तीनशेच्यावर विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. अंधश्रद्धा, मानसिक गुलामगिरी, समाजातील अनिष्ट चालीरीती या बंधनात अडकलेल्या स्त्रीला प्रातिनिधिक स्वरूपात मुक्त करून अनोख्या पद्धतीने या कार्यशाळेचे उद़्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.टी.आर. शहा व शिक्षिका शेख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजपूत म्हणाले, योग्य ठिकाणी अन्यायाविरुद्ध विरोध करण्याची क्षमता आजच्या स्त्रीमध्ये निर्माण झाली पाहिजे. घरांमध्ये निर्णयात स्त्रीला सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.पहिल्या सत्रात प्रा.परेश शाह यांनी स्त्री आणि अंधश्रद्धा या विषयाची मांडणी केली. यावेळी युवतींच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. दुसऱ्या सत्रात तन्वी खैरनार हिने जन्माची कहाणी विषद केली. देवेंद्र नाईक यांनी महिला सुरक्षेसाठी असणाºया कायद्याची आणि आधुनिक मोबाईलचे वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार आणि त्याविषयीच्या कायदेशीर प्रक्रिया बाबतचे पोस्टर प्रदर्शन पाहण्यास खुले करण्यात आले.तिसºया सत्रात गटचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये स्त्री-पुरुष समानता, प्रसार माध्यमांमधील स्त्री प्रतिमा, आधुनिकतेच्या नावाखाली परंपरांचे उदात्तीकरण आणि आरोग्य या विषयांवर गटचर्चा घेण्यात आली. या चर्चेचे सादरीकरण साक्षी पवार, करुणा गिरासे, पूजा पवार, जागृती भामरे, नीलिमा देवरे, धनश्री धनगर या विद्यार्थिनींनी केले. गटसमन्वयक म्हणून प्रा.दीपक माळी, प्रा.जी.के. परमार, प्रा.डी.एस. माळी, प्रा.संदिप गिरासे, प्रा.बी.पी. कढरे यांनी काम पाहिले. प्रा. वैशाली परदेशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचा समारोप ‘हम होंगे कामयाब’ या गीताने करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे