धुळे : तालुक्यातील मोरशेवडी येथील शेतातील विहिरीत शितल गवळी नामक महिलेचा मृतदेह आढळून आला़ ही घटना सोमवारी घडली़ तिचा शोध घेतला जात होता़ पण, विहिरीच्या कपारीत ती अडकल्याचा अंदाज होता़ तिचा शोध सुरु असतानाच तिचा मृतदेह मंगळवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या धुळ्यातील माहेरच्या नातलगांनी मोरशेवडी गावात धाव घेतली होती़ धुळे तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली़ तिच्यावर शवविच्छेदन करण्यात येत आहे़
मोरशेवडीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:44 IST