शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

भरधाव ट्रकने महिलेले नेले फरफटत, जागेवरच गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 22:13 IST

मुंबई-आग्रा महामार्ग । देवभान-कापडणे फाट्यावरील अपघाताने सर्वच सुन्न, गतिरोधकाच्या मागणीसाठी दीड तास ठिय्या, तातडीने पोलीस दाखल

कापडणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर शनिवारी दुपारी ट्रक अपघातात मोराणे येथील पुष्पाबाई पाटील या जागीच ठार झाल्या़ कापडणे येथे अंत्ययात्रेसाठी त्या पती सोबत दुचाकीने येत असताना ही दुर्घटना घडली़ घटनास्थळी गतिरोधकाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले़ घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस दाखल झाले होते़धुळे तालुक्यातील कापडणे येथील शालिग्राम पाटील यांच्या अंत्ययात्रेसाठी देविदास निकम (पाटील)  आणि त्यांची पत्नी पुष्पाबाई हे दोघे एमएच १८ एएफ ५२९७ क्रमांकाच्या दुचाकीने धुळे तालुक्यातील मोराणे येथून येत होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरुन कापडणे गावाकडे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणारा युपी ७२ एटी ५३६० क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात देविदास निकम हे पुढे फेकले गेले़ परिणामी ते केवळ जखमी झाले आहेत़ परंतु त्यांची पत्नी पुष्पाबाई या मात्र ट्रकच्या चाकाखाली आहे़ ट्रक सोनगीरच्या दिशेने जात असल्याने त्या किमान दिड ते दोन किमी अंतरापर्यंत फरफटत गेल्याने त्यांचे शरीर धडापासून वेगळे झाले होते़ यात पुष्पाबाई यांचा जागीच मृत्यू ओढवला़ घटनास्थळीच मयत झालेल्या  पुष्पा पाटील यांच्या मृत शरीराला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले होते. दीड तास आंदोलनअपघाताची घटना इतकी भयंकर होती की अक्षरश: सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला़ बºयाच महिन्यापूर्वी केंद्र शासनाच्या आदेशान्वये महामार्गावरील देवभाने कापडणे फाट्यावरील गतिरोधक काढले गेले असल्यामुळे यामुळे भरधाव वेगाने येणाºया वाहनचालकांचे नियंत्रण नसल्याने याठिकाणी नियमित अपघात होतात़ वाहनचालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे़ याठिकाणी तात्काळ गतिरोधक टाकण्यात यावेत अशी रास्ता रोको करणाºया ग्रामस्थांनी लावून धरली होती़ तब्बल दीड तासापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अडविण्यात आले होते. यामुळे देवभाने ते नगाव या चार ते पाच किलोमीटर आंतरापर्यंत थांबलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या़ पोलीस घटनास्थळी दाखलअपघात आणि त्यानंतर झालेला रास्ता रोको यामुळे वातावरण तणावपुर्ण झाले होते़ घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी धुळे येथील केंद्रीय कमांडो पोलीस पथकाला पाचारण केले़ यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांचा ताफा घटनास्थळी पोहचला़ त्यानंतर जमलेल्या गर्दीला समज देण्यात आली व आंदोलन मागे घेण्यात आले़ त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली़ मोराण्यात हळहळपुष्पाबाई पाटील यांचा अचानक अपघातात मृत्यू झाल्याने मोराणे गावात हळहळ व्यक्त झाली़ त्यांच्या कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ मयत पुष्पाबाई पाटील यांच्यावर सायंकाळी सहा वाजता मोराणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पती देवीदास पाटील, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते संदीप पाटील, विनोद पाटील आणि मुंबई पोलीस सागर पाटील यांच्या आई होत़अंत्ययात्रेला जात असतानाच अंतधुळे तालुक्यातील मोराणे येथे राहणाºया  पुष्पाबाई देविदास निकम (पाटील) (वय ५० वर्ष) या कापडणे येथे निधन झालेल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेस जाण्यासाठी सकाळी घरातून निघाल्या. पण अंत्ययात्रेत सहभागी होण्याआधीच देवभाने फाट्यावर झालेल्या अपघातात त्यांचा अंत झाला.

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात