‘ड’ वर्ग महापालिकेसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:00 PM2018-12-08T22:00:00+5:302018-12-08T22:00:35+5:30
अनिल गोटे : पोलीस सत्तारूढ पक्षाचे वेठबिगार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळयाचे पोलीस कायद्याचे नव्हे तर सत्तारूढ पक्षाचे वेठबिगार झाले असून मुख्यमंत्र्यांना हेच हवे आहे का? असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला़ ‘ड’ वर्ग मनपाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लावल्याचेही ते म्हणाले़
देवपुरातील विधी महाविद्यालय परिसरात ८ मुली व १८ मुले काही दिवसांपासून आली होती़ आमचे उमेदवार अॅड़विशाल साळवे, आनंदा पाटील हे तेथे गेले असता त्यांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या़ त्यावेळी दोन जणांनी त्यांच्या बॅगा फेकून देत पळण्याचा प्रयत्न केला़ ती मुले आम्हाला जाऊ द्या असे सांगत असतांना पोलीसांनी त्यांच्यावर दबाव टाकत त्यांना आमच्या उमेदवारांविरूध्द गुन्हा दाखल करायला भाग पाडले़ जळगावची एक कार जयहिंद महाविद्यालय परिसरात संशयास्पदरित्या फिरतांना आढळल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी ती फोडली़ त्यावेळी दोन जणांनी पळ काढला़ मात्र त्यांना ताब्यात न घेता गाडी पकडून देणाºया दिलीप साळूंखेना पोलीसांनी ताब्यात घेतले़ पारोळयाचे लोक आम्हाला तक्रार द्यायची नाही, असे सांगत असतांना पोलीस अधिकारी हिरे व गांगुर्डे यांनी त्यांना तक्रार देण्याचा आग्रह धरला़ त्यामुळे मला स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन ठाण मांडावे लागले, असे गोटे म्हणाले़ पोलीसांनी इतकी तत्परता दाखवली की, तक्रार दाखल होण्यापूर्वीच दिलीप साळूंखेंना मेडिकलसाठी नेले़ मी रात्री एक वाजता आंदोलनाची धमकी दिल्यानंतर साळूंखे यांना सोडल्याचे गोटे म्हणाले़ आमचा कार्यकर्ता बंटी पाटीलला बेदम मारहाण करण्यात आली व त्याच्यावरच ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला़ बंटीला मारहाण करणाºयांना पोलिसांनी तत्काळ अटक केली नाही तर उपोषणाला बसेल, असा इशाराही आमदार गोटे यांनी दिला़