शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अवधान येथे पालकमंत्र्यांची पाठ फिरताच  व्यासपीठावर दोन गटांत ‘फ्रीस्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 11:25 IST

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

ठळक मुद्देमनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची होती पहिलीच जाहीर सभासभेनंतर दोन गट एकमेकांना भिडले पोलिसांना करावा लागला बळाचा वापर

आॅनलाइन लोकमतधुळे : शिवसेना उमेदवारांचा प्रचार करून पालकमंत्री दादा भुसे हे व्यासपीठावरून खाली उतरत असतांनाच किरकोळ कारणावरून दोन गट एकमेकांना भिडले. व्यासपीठावरच त्यांची  ‘फ्री स्टाईल’ झाली.  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अवधान येथे घडली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अवधान गावातील महादेव मंदिर चौकात मंगळवारी रात्री पालकमंत्री दादा भुसे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेनेची ही पहिलीच सभा होती. या सभेत पालकमंत्री दादा भुसे यांनी सभेत धुळे शहर गुंडगिरीमुक्त, भयमुक्त शहर करण्यासाठी शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन केले. आपले भाषण आटोपून पालकमंत्री व्यासपीठावरून उतरू लागताच सभेत बोलू दिले नाही म्हणून एका तरूणाने हुज्जत घालण्यास सुरूवात केली. पालकमंत्री थोडे अंतर जात नाही तोच दोन गट परस्परांना भिडले. पोलीसासमोरच ही  ‘फ्रीस्टाईल’ जवळपास १५ मिनिटे सुरू होती. यात लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आला. अचानक घडलेल्या या हाणामारीमुळे उपस्थितांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सभास्थळी केवळ एकच हवालदार उपस्थित होता. पोलिसाने हाणामारी करणाºयांना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र जमावापुढे त्यांचे प्रयत्नही अपूर्ण पडले. या घटनेमुळे तरूणांचा एक गट मोहाडी पोलीस स्टेशनकडे निघाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून काहींनी मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या परिसरात बंदोबस्त वाढविल्यानंतर परिसरात शांतता झाली. या प्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसºयाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  दरम्यान शिवसेनेच्या पहिल्या सभेतच ‘दांगडो’ झाल्याची चर्चा सुरू होती.  दरम्यान मारामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, ते स्पष्ट झालेले नाही.  

टॅग्स :Dhuleधुळे