हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६ बाय ६४ फूट असून वजन ९० किलो आहे, तर ध्वजस्तंभाची उंची देखील ७४ मीटर असून तो ९० टन वजनाचा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम, राजर्षी शाहू-जोतिबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा (राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे.
स्वराज्यध्वजाचे श्री एकवीरा देवी मंदिरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST