शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कासारे, पिंपळनेर येथे कावड घेवून जाणाऱ्या भाविकांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:42 IST

हजारो भाविक पदयात्रेत सहभागी। स्वागतादरम्यान ग्रामस्थांतर्फे भक्तांसाठी भंडारा

कासारे/पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कासारे व पिंपळनेर येथे सप्तश्रृंगी गडावर कावड घेऊन जाणाºया पायीदिंडीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.कासारे येथे ग्रामस्थांच्यावतीने शहादा, प्रकाशा, पानसेमल, खेतिया, मामाचे मोहिदे, भटाणे, भामेर येथून निघणाºया व सप्तश्रृंगी गडावर जाणाºया कावड दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.२४ वर्षांपासून शहादा, प्रकाशा, पानसेमल, खेतिया, मामाचे मोहिदे, मध्य प्रदेशहून सुमारे दोन हजार भक्तांचे कावड दिंडीचे शहादा, प्रकाशा येथून सोमवारी त्रिवेणी संगमाचे पवित्र जल सोबत घेऊन कोजागिरी पौर्णिमेला गडावर जाऊन ह्याच पवित्र जलाने कुलस्वामिनी सप्तश्रृंगी देविचे स्नान घातले जाते. ह्या दिंडीचे मुख्य आयोजक मनिलाल भिमजी पटेल, जगन पटेल, दिलीपभाई पटेल, दिलीपभाई चित्ते, पुरूषोत्तम पटेल हे आहेत.सदर दिंडी कासारे येथे बुधवार बुधवारी सायंकाळी ६ वाजता पोहचली. ग्रामस्थांतर्फे दिंडीचे मोठ्या थाटात वाजत गाजत, नाचत स्वागत करण्यात आले. त्यासाठी गावातील नागरिक व महिला भक्तगण, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक कॉलनी येथे आयोजक सप्तश्रृंगी माता विधायक संस्थेचे चेअरमन सुरेश बुधाजी गवळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कासारे येथे यानिमित्त दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गावांत व समाजात शांतता नांदावी, गावातील लोक सुखी, समद्धी, निर्व्यसनी व दिघार्युषी राहवे हा उदात्त हेतू ठेवून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी कासारे येथून पुढे दिघावे, सोमपूर, ढोलबारे, कंधाने, कळवण, नांदूरीमार्गे गडावर जाईल. सदर दिंडीत कासारे येथील भावीक युवक भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले. सदर कार्यक्रमास आयोजक सुरेश गवळे, तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख, डॉ.हेमंत पारख, सतिष वाणी, विश्वनाथ वाणी, शेखर शहा, जणू देसले, विलास देसले, किशोर जैन, डॉ.हिरालाल जैन, पिंगळे, मनोहर भामरे, एच.के. देसले, संदिप भट, बाला रेलन, लखन बागुल, विजय रेलन, चेतन जैन, राजेंद्र चौधरी,राजेंद्र्र देसले, गोटू सोनार, सचिन देसले, अनिल चौधरी, गिरिष देसले, जितेंद्र देसले, संजय देसले, सुभाष देसले, अरूण चव्हाण, बाळकृष्ण तोरवणे, नवरात्रोत्सव मंडळ, बहुद्देशीय माध्य.विद्यालय, बिजासनी मंडप वाले व गावांतील सामाजिक, राजकिय, शैक्षणिक धार्मिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.पिंपळनेरश्री सप्तश्रृंगी देवीच्या गडावर धाडणे येथील जय अंबे मित्र मंडळातर्फे ४३ वर्षापासून तर तळोदा येथील आई सप्तश्रृंगी कावड पदयात्रेचे २१ वर्षापासून पदयात्रा करत देवीच्या चरणावर खान्देशातून पाणी व पैठणी चढवण्याचा कार्यक्रम होतो. त्या दोन्ही कावड घेऊन जाणाºया भाविकांचे पिंपळनेर मराठा समाजातर्फे पालखीचे स्वागत या भाविकांना भोजन देण्यात आले.तळोदा येथील नरेशभाई चौधरी यांच्या नेतृत्वात, अश्वीन परदेशी व कुणाल ठाकरे व मंडळाचे ६०० पुरुष व १०० महिलांचा जथ्था पालखी व कावड घेऊन निघाले. सप्तश्रृंगी मातेला तळोद्याचीच पैठणी नेसवली जाते हा तळोदेकरांचा मान आहे. १९९९ पासून भाविक या गटावर पायी जातात. तर धाडणे ता.साक्री येथील हरिष साहेबराव अहिरराव महाराजांच्या नेतृत्वात गेल्या ४३ वर्षापासून ऋषीकेश भदाणे, जितेंद्र खैरनार हे कावड व पालखी पदयात्रा घेऊन गडावर जातात व देवीच्या चरणी पाणी अर्पण करतात. दोन्ही मंडळांतर्फे भाविकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला जातो. वरील दोन्ही मंडळाचे दरवर्षी पिंपळनेर मराठा पाटील समाजातर्फे स्वागत केले जाते. मराठा मंगल कार्यालयात सर्व भाविकांना स्नेहतोजनाचा कार्यक्रम झाला. यावर्षी मराठा पाटील समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शैलू गांगुर्डे, सरपंच साहेबराव देशमुख, विजय गांगुर्डे, बंडू पाटील, विशाल गांगुर्डे यांनी स्वागत केले व आरती केली. सर्व भाविकांना स्नेहभोजन भंडारा दिला. ही परंपराही मराठा पाटील समाजातर्फे अखंडपणे चालू आहे. त्यानंतर सर्व कावड मंडळांचे भाविक सप्तश्रृंगी गडाकडे प्रयाण झाले.

टॅग्स :Dhuleधुळे