शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात आदिशक्तीचे जल्लोषात झाले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:51 IST

एकवीरादेवी मंदिरात महापौर कल्पना महाले यांच्याहस्ते महाआरती

ठळक मुद्देनवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यात उत्साहाचे वातावरणएकवीरादेवी मंदिरात विधीवत घटस्थापनाहजारो भाविकांनी घेतले दर्शन

आॅनलाइन लोकमतधुळे- गणपती पाठोपाठ शहर व जिल्ह्यात आदिशक्ती देवीची मोठ्या उत्साहात व जल्लोषात बुधवारी स्वागत करण्यात आले. विविध मंडळांच्या ठिकाणी  विधीवत पूजन करून देवीची स्थापना करण्यात येत होती. दरम्यान मूर्तीसह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केल्याने, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तर घटस्थापनेच्या शुभमहूर्तावर अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व  वाहनांची खरेदी केल्याने, बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. एकवीरादेवी मंदिरात घटस्थापना खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरातही बुधवारी सकाळी विधीवत घटस्थापना करण्यात आली.  श्रीएकवीरा देवी व रेणूका माता मंदीर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याहस्ते पहाटे ५ वाजता सपत्नीक काकडारती व पुजाविधी झाला. दुपारी १२ वाजता महापौर कल्पना महाले,  यांच्याहस्ते महाआरती झाली. यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव उपस्थित होत्या. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. पहिल्या माळेलाच दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.  नवरात्रोत्सवात खान्देश कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परराज्यातूनही भाविक गर्दी करतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना २४ तास आई भगवतीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस, होमगार्ड व सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बाजारात उत्साहशहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडसह पुढे दत्त मंदिर, साक्रीरोडवरील जिल्हा रुग्णालय जवळ, फुलवाला चौक आदी परिसरात घटनस्थापनेचे पुजा साहित्य व दुर्गामूर्ती खरेदीसाठी नागरिकांची व विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळली होती.  संध्याकाळीही अनेक भक्तांनी दूर्गादेवी मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली़ आग्रारोडवर गरबा, रास दांडिया,यासाठीचे साहित्य, पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक मंडळांनी वाजतगाजत देवीची मूर्ती मंडपात नेली होती. जिल्ह्यात जवळपास २५० मंडळांतर्फे नवरात्रोत्सव साजरा केला होता. यातील बहुतांश मंडळांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.अनेकांनी साधला घटस्थापनेचा मर्हूतदरम्यान यावर्षी कमी झालेला पाऊस व पितृपक्ष यामुळे गेले १५ दिवस बाजारपेठेत मंदी सदृश्य वातावरण होते. मात्र घटस्थापनेचा महूर्त साधून अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहनांची खरेदी केली. यामुळे लाखो रूपयांची उलाढाल झाली. या आर्थिक उलाढालीमुळे व्यापाºयांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झालेले होते. 

टॅग्स :Dhuleधुळे