शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहराला पांझरा नदीपात्रातून पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:47 IST

पाणी वाचविण्यासाठी मनपाची धडपड, दहा गावांच्या पाणीपुरवठ्याचे आव्हान

ठळक मुद्दे- शहर हद्दवाढीमुळे दहा गावांना पाणीपुरवठ्याचे आव्हान- नकाणे तलावातून पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंद- नकाणे तलावात केवळ १०० दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी धुळयात दाखल झाल्यामुळे नकाणे तलावातून आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे़ पांझरा नदीपात्रातून पाणी उचलून शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली़शहराला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो़ त्यामुळे जून, जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान मनपासमोर असते़ गेल्या वर्षी जुन महिन्यातही पावसाचे आगमन न झाल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून ऐनवेळी पाणी घेण्याची वेळ मनपा व पाटबंधारे विभागावर आली होती़  त्यामुळे यंदा अक्कलपाडा प्रकल्पातून पहिले आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते धुळयात पोहचताच मनपाने नदीतून पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे़ हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्राजवळून पाणी पंपिंग केले जात आहे़ परिणामी, नकाणे तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे़ यंदा शहर हद्दवाढीमुळे मनपाला १० गावांना पाणीपुरवठा करण्याचे आव्हान असणार आहे़ त्यामुळे पाणी वाचविण्यावर भर दिला जात आहे़ सद्यस्थितीत नकाणे तलावात १०० दिवस पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे़ तापी जलवाहिनीवरून शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा होत असून नकाणे तलावातून उर्वरीत ४० टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो़ सद्यस्थितीत तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज २ एमएलडी पाणी लागत असून सद्यस्थितीत ४ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे़ १३६ कोटींच्या पाणी योजनेतून शहरात जलवाहिन्यांसह जलकुंभांची संख्या वाढल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे़ पाणी योजनेतून ८ व मनपाने स्वत: २ नवीन जलकुंभ उभारले आहेत़