शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मालणगाव धरणाचा पाणीप्रश्न पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:27 IST

दहिवेल : साक्रीला जलवाहिनीद्वारे मालणगाव धरणाचे पाणी देण्यास १६ गावांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : साक्री शहरासाठी मालणगाव धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी देण्यास मालणगाव धरणबचाव संघर्ष समितीने विरोध केला आहे. शुक्रवारी मालणगाव येथे झालेल्या समितीच्या बैठकीला परिसरातील १६ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.   मालणगाव धरणाच्या लाभ क्षेत्रातील १६ ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात धरणातून जलवाहिनीद्वारे साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यास विरोध करणार प्रस्ताव पारित केला होता. या गावातील सुमारे ५० हजार लोकांनी याला विरोध दर्शविला होता. प्रशासनाला व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डि.एस.अहिरे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना यासंदर्भात निवेदनही दिले आहे. समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत येत्या आठ दिवसात सर्व गावांच्या पुन्हा विशेष ग्रामसभा घेऊन या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. धरण संघर्ष समितीच्या दबावाने २९ नोव्हेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले होते. परंतु सातव्या दिवशीच पाटचारी फुटली की कुणाच्या लाभासाठी फोडण्यात आली. यासंदर्भातही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.बैठकीस मालणगाव, खरडबारी, सातारपाडा, बोडकीखडी, दहिवेल, भोनगाव, कालदर, किरवाडे, घोडदे, सुरपान, बर्डीपाडा, बोदगाव, आमोडे, छडवेल या गावांचे सरपंच उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंतराव बच्छाव होते. तर जि.प.सदस्य प्रभाकर बच्छाव, मधुकर बागुल, माजी सरपंच दत्तात्रय वसंतराव बच्छाव, दत्तात्रय पाटील, देविदास पाटील, हिम्मतराव पाटील, एकनाथ गुरव, भास्कर बच्छाव, दिलीप बच्छाव, कन्हैयालाल माळी, राजेंद्र पाटील, बापू माळी, सुक्राम महाले, सुक्राम ठाकरे, साहेबराव चौधरी, युवराज चौरे, गोविंदा देवरे, पांडू कोकणी, गोरख मालचे, भाऊसाहेब गांगुर्डे, जितेंद्र गवळी, सुधीर मराठे, साहेबराव बिरारीस, सतीष पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे