शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

नियोजनाअभावी आठ-दहा दिवसांआडच मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:30 IST

महापालिका : बहुतांश भागात टंचाई; लोकप्रतिनिधींनाही प्रशासनाचा ठेंगा

धुळे : जिल्ह्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे़ त्यामुळे पांझरा नदीत पाण्याचा विर्सग देखील सोडण्यात आला होता़ पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतांना देखील केवळ नियोजना अभावी नागरिकांना पिण्यासाठी कासावीस करावी लागत आहे़यंदा पाच महिने पावसाने हजेरी लावली होती़ जिल्ह्यातील लाटीपाठा, मालनगाव, जामखेली, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अमरावती, अनेर सोनवद, कनोली असे १२ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत़ शहराला पाणी पुरवठा करणारे अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने नकाणे, डेडरगाव तलावात आर्वतन सोडण्यात आले आहे़ त्यामुळे दोन्ही तलाव शंभर टक्के भरले आहे़ तर तापीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकणारा आहे़ मात्र असे असतांना देखील शहरातील बहूसंख्य भागात नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़मनपाच्या विहरी देखील भरल्याशहरात मनपा मालकीच्या अहिल्यादेवी नगर, अण्णासाहेब पाटील नगर, सोन्या मारूती कॉलनी, सिध्दार्थ नगर, नवजीवन नगर, शनि नगर व जमनागिरी भिलाटी याठिकाणी विहीरी आहेत़ यंदा पुरसा पाऊस झाल्याने या विहरी भरल्या आहेत़ मात्र बहूसंख्या विहरीचे हातपंप नादुरूस्त, तर पंप चोरीला गेले आहे़ त्यामुळे बऱ्याच वर्षापासून विहरीतील पाण्याचा उपसा झालेला नसल्याने काही विहरीचे पाणी पिण्या योग्य नाही़ त्यामुळे विहरीत पाणी उपलब्ध असतांनाही नागरिकांना पाण्यासाठी ८ ते १० दिवस वाट पहावी लागते़पाणीप्रश्न सुटू शकतोमनपा मालकीच्या बहूसंख्य प्रभागामध्ये विहरी पडून आहे़ मात्र पाण्याचा उपसा व विहीरीतील गाळ व पंप बसवून परिसरातील नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़़ त्यामुळे पाण्याचा उपसा झाल्याने विहरी जिवंत होऊ शकतात व पाणीप्रश्न सोडविण्यात देखील मदत होऊ शकते़याठिकाणी टंचाईनकाणे तलावावरून कुमार नगर, सिमेंट जलकुंभ, अशोक नगर व राम नगर असे चार जलकुंभ भरले जातात़ त्यावरून ांपूर्ण मोगलाई भाग, पेठ भाग, ८० फुटी रोड, ४० गाव रोड, राजकमल टॉकीजच्या मागील परिसर, जुने धुळे परिसरातील निम्मा परिसर, अशोक नगर, चितोड रोड आणि राम नगर पाणीपुरवठा होतो़

टॅग्स :Dhuleधुळे