शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: March 24, 2017 00:23 IST

जैताणे : नकट्या बंधाºयात ३० टक्केच पाणीसाठा

जैताणे :  साक्री  तालुक्यातील माळमाथा परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाºया जैताणे गावातील ग्रामस्थांवर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथील नकट्या बंधाºयात ३० ते ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जैताणे परिसरातील भूजल पातळी कमालीची घसरल्याने पाणीपुरवठ्यासाठी वापरात असणाºया कूपनलिकाही एकापाठोपाठ आटत चालल्या आहेत.  ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग दिवसरात्र परिश्रम घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी झटत आहे. आटत जाणाºया कूपनलिकांऐवजी पर्यायी राखीव कूपनलिकांचा वापर करून समस्येवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. काही कूपनलिकांमधील सबमर्सिबल पंप अधिक खोलवर उतरवून पाणी शोधले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून पाच ते सहा दिवसांआड नळांना पाणी येत असल्याने वेळप्रसंगी पाण्यासाठी पायपीट करून भटकंती करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे.परिसरातील जलपातळीचे प्रमुख स्त्रोत असणाºया नकट्या बंधाºयाच्या जलसाठ्यातही झपाट्याने घट होत चालली आहे. आजअखेर फक्त ३० ते ३५ टक्केच जलसाठा या बंधाºयात शिल्लक आहे. त्यात अजून पूर्ण उन्हाळा बाकी आहे. आजच अशी स्थिती असल्याने पुढे काय? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नकट्या बंधाºयाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातून प्रशासनाकडे व शासनदप्तरी वारंवार करण्यात येऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जलसाठा झपाट्याने संपत असल्यामुळे पुन्हा एकदा या मागणीने उचल धरली आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. वीज महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनाचा फटकाही सार्वजनिक पाणीपुरवठ्याला बसत आहे. येथील सरपंच संजय खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात भारनियमन बंद करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ठरलेल्या भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्तही चार-पाच तास वीजपुरवठा खंडित असतो. म्हणून वेळेत कूपनलिकांवरून जलकुंभ भरणे शक्य होत नाही. त्याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्याच्या नियमिततेवर होत असल्याची प्रतिक्रिया यादव भदाणे यांनी दिली.