शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ५५ हजार शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:09 IST

कर्जमाफी : लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम सुरू

ठळक मुद्देकर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळावा; यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली होती. या कमिटीतील सदस्य अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम करत आहे.अनेकांचे कर्ज घेतांना नाव दुसरे व अर्ज भरताना वेगळ्या नावाने भरले गेले आहे. तर अनेकांनी कर्जमाफीसाठी अर्ज करूनही त्यांचे नाव यादीतच आले नसल्याची परिस्थिती आहे.तालुकास्तरीय कमिटी शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करून राष्टÑीयकृत बॅँकांना देणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; तर जिल्ह्यात ५५ हजार ५०३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकºयांच्या अर्ज  पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व  दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषीत करण्यात आले होते. 

३२ हजार शेतक-यांच्या खात्यात ११८ कोटी जमा शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आपले सरकार या पोर्टलवर अर्ज केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार २०२ शेतकºयांना आतापर्यंत लाभ मिळाला असून या शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११८ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ जमा करण्यात आले आहे. ३२ पैकी २५ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया एकूण शेतकºयांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार असून त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जानेवारी अखेरपर्यंत जमा झाली आहे. तर उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे कर्जदार असून या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.