शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी उपनगरात दुपारनंतर मतदारांच्या रांगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 15:50 IST

धुळे मनपा निवडणूक : सकाळी अनुत्साह, दुपारपर्यंत तुरळक वर्दळ 

ठळक मुद्देप्रथमच सकाळी जाणवला शुकशुकाट दुपारपर्यंत तुरळक वर्दळ, महिलांचा लक्षणीय सहभागदुपारी एक वाजेनंतर मात्र लागल्या रांगा 

लोकमत आॅनलाईन धुळे  - महापालिकेच्या प्रभाग १८ मधील मोहाडी उपनगर परिसरात दुपार १ वाजेपर्यंत मतदानासाठी अनुत्साह जाणवला. मात्र त्यानंतर मतदारांची गर्दी होऊन रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी मतदान केंद्रास भेट देऊन प्रक्रियेची पाहणी करून माहिती घेतली. मोहाडी उपनगर हा राष्टÑवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.  परंतु यावेळी भारतीय जनता पक्षाने आव्हान उभे केल्याने मोठी चुरस निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.  एरव्ही सकाळी मजूर व नोकरदार वर्गाच्या मतदानासाठी रांगा लागतात. मात्र यावेळी प्रथमच सकाळी एवढा शुकशुकाट जाणवल्याचे तेथील जाणकारांनी सांगितले. श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयात  मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या केंद्रावर फेरफटका मारला असता तुरळक मतदार दिसून आले. सकाळी तर शुकशुकाट  दिसून आला. मात्र साडेआठ-नऊ वाजेनंतर मतदारांची तुरळक वर्दळ सुरू झाली. दुपारी साडेबारापर्यंत ‘जैथे थे’ स्थिती होती. त्यातही महिला मतदारांचाच वावर दिसून आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त देशमुख यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत उपायुक्त रवींद्र जाधव होते. त्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रक्रियेबाबत माहिती घेतली.  दुपारी दीड वाजेनंतर मात्र मतदान केंद्रांवर गर्दी झाली. छोट्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: महिला मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. उपनगरात शिरताना जलकुंभ असलेल्या परिसरात विविध राजकीय पक्षांचे बुथ दिसले. तेथे मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. मात्र मतदान केंद्रांच्या परिसरात विविध पक्षांचे कार्यकर्ते, बंदोबस्तावर तैनात पोलीस यांचीच मोठी गर्दी दिसत होती. दुपारी १ वाजेनंतर लागल्या रांगा मोहाडी उपनगरातील मतदान केंद्रांवर दुपारी १ वाजेनंतर मतदारांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. त्यातही महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून आली. येथील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तुलनेते जास्त फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक