शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:44 IST

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : नागरिकांमध्ये अधिकाराबाबत जागृती

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे- महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यासाठी चांगले प्रयत्न झाले. मतदानाच्या अधिकाराबाबत विशेषत: युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती घडून आली आहे. अन्य मतदारही जागरूक असून या निवडणुकीत निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महापालिका निवडणूकीसाठी रविवारी मतदान होणार आहे़ या प्रक्रियेसाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्ते तसेच मतदारांनी शांतता ठेवावी़ नियम व कायदे पाळावेत, गैरकृत्य करु नये, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी  साधलेला संवाद़़़़प्रश्न : महापालिका निवडणुकीत निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी काय प्रयत्न झाले. राहुल रेखावार : निवडणुकीसाठी महापालिकेचे आयुक्त, प्रशासन यांना आवश्यक सूचना दिल्या. त्याप्रमाणे कार्यवाही झाली, सुरू आहे. शहरात  होर्डिेग्ज लावून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मुख्य निरीक्षक सौरभ विजय, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनीही आवश्यक सूचना दिल्या आहेत. कामगारांना मतदानासाठी वेळ देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे  निश्चितपणे मतदार मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास आहे. प्रश्न : मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी काय कार्यवाही केली?राहुल रेखावार : सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात असून रोजची कार्यवाही व घटना, घडामोडींचा फॉलोअप घेत आहे. जेथे जेवढा हवा तेवढा बंदोबस्त देण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात प्रचार संपला तेव्हापासून तसेच शहर हद्दीपासून २५ कि.मी.च्या आत सर्व प्रकारच्या मद्यविक्रीचे अदेश दिले आहेत. दुकाने उघडी किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. गुंडांवर हदपारी तर काहींना मतदानाच्या दिवशी शहर सोडून जाण्याच्या सूचना दिल्या आहे.प्रश्न : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीबद्दल आपली काय भूमिका आहे?राहुल रेखावार : कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चुरशीने लढली जाते. राज्य, राष्टÑीय स्तरावरील विषयांना नव्हे तर स्थानिक विषयांना प्राधान्य असते. कोण उमेदवार आपले प्रश्न सोडवेल, त्या अनुषंगाने लोक मतदान करतात. सक्षम, सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार निवडण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे. तर मनपाच्या माध्यमातून शहर विकास साधण्यास मदत होईल. प्रश्न : मतदान करण्याबाबत मतदारांना काय संदेश द्याल?राहुल रेखावार : सर्वार्थाने योग्य व धडपड्या उमेदवाराची निवड करा. जो मध्यरात्रीही तुम्हाला मदत करू शकेल. योग्य उमेदवारास मतदान करताना त्याचा पक्ष, जात, धर्म असे कोणते बंधन पाळू नका. मोठ्या संख्येने मतदान करा. सोबत इतरांनाही मतदानासाठी आणा, असे नागरिकांना आवाहन आहे. प्रश्न : शहर विकासाबाबत मतदारांना काय सांगाल?राहुल रेखावार : निवडणूक ही संधी असते. शहराचा विकास झाला तर सर्व सुखी होती. त्यामुळे दूरदृष्टीने आपल्या प्रभागासह संपूर्ण शहराचा विकास करण्याची धडपड व प्रयत्न करतील, निधी खेचून आणतील, अशा उमेदवारांना संधी दिली पाहिजे. तरुणांनो, पुढाकार घ्याया निवडणुकीत नव्या युवा मतदारांनी स्वत:सोबत मतदानासाठी इतरांनाही प्रेरीत करावे, त्यासाठी पुढाकार घ्यावा. मतदान करण्यासाठी पैसे,   दारू, बक्षिसे, भेटवस्तू अशा कोणत्याही आमिषाला बळी          पडू नका. इतरांनाही त्यापासून परावृत्त करा. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही रेखावार यांनी केले.

टॅग्स :DhuleधुळेDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक