धुळे : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला जमाबंदीचा आदेश झुगारुन देवपूरातील नकाने रोडवरील आनंद नगरात झेड़ बी़ पाटील उद्यानात मैदानी खेळांसाठी एकत्र येवून गर्दी करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवासी राजेंद्र यशवंतराव सावंत यांनी केली आहे़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्कालीन व साथरोग अधिनियमाच्या खंड दोन नुसार मोकळी मैदाने, प्रार्थना स्थळे, ओपन जिम इत्यादी ठिकाणी जमावबंदी असून धुळे जिल्हाधिकाºयांनी २० मार्च रोजी तसे आदेश दिले आहेत़ या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे़राजेंद्र सावंत यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे ११ जून रोजी लेखी तक्रार केली आहे़तक्रारीत म्हटले आहे की, आठ जूनपासून ते आजपावेतो नियमित सकाळी सात वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत झेड़ बी़ पाटील उद्यानाच्या मैदानात व्हॉलीबॉलसह इतर खेळ खेळण्यासाठी गर्दी होत आहे़ त्यात पोलीस कॉन्स्टेबल विलास मराठे रा़ एसआरपी कॉलनी नकाने रोड, एस़ पी़ पाटील रा़ स्टेट बँक कॉलनी, प्रा़ मनिष पाटील, एका मंगल कार्यालयाच्या मालकाचा मुलगा, गिरीष मराठे रा़ गरुड कॉलनी, पंकज बोरसे रा़ इंदिरा गार्डन यांच्यासह १५ ते २० लोक दररोज सकाळी एकत्र येवून गर्दी करतात़ त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यत आहे़ त्यांना मनाई करुन देखील उपयोग झाला नाही़ पोलीस नियंत्रण कक्ष आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फोनवर तक्रार करुनही उपयोग झाला नाही असे तक्रारीत म्हटले आहे़मैदानात गर्दी होत असल्याने परिसरात संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे़ संबंधितांवर त्वरीत कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:47 IST