शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी स्वच्छतेची चळवळ गतिमान करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:41 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी केले प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी स्वच्छतेची चळवळ गतिमान करावी. या स्पर्धेच्या माध्यमातून गावपातळीवर स्वच्छताविषयक सवयींमध्ये सातत्य राखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., यांनी आज येथे केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा औपचारीक शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल उपस्थित होते. गंगाथरण डी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. सामुदायिक शौचालयांचा वापर करणाऱ्या लाभार्थ्यांनी तत्काळ शौचालय बांधकाम करून, प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा. सुंदर शौचालय रंगवून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. मधुकर वाघ यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेची माहिती दिली. पाणी गुणवत्ता तज्ज्ञ विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील तज्ज्ञ व सल्लागार यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे