शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

गाव पाणीदार होण्यासाठी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:33 IST

विंचुरच्या पोलीस पाटील भारती बोरसे यांची कामगिरी : महिलांसह विद्यार्थी, ग्रामस्थांचीही मिळतेय साथ

रवींद्र बोरसे ।विंचूर : नोव्हेंबर २०१८ ला विंचूर गावासाठी पोलीस पाटील म्हणून नियुक्त झालेल्या भारती सुरेश बोरसे यांनी विंचूर गाव परिसर पाणीदार होण्यासाठी पुढाकार घेऊन पानी फाऊंडेशनच्या कामास जोमाने सुरवात केली आहे. त्यांना इतर महिलांची मोलाची साथ मिळत आहे.प्राचीन काळापासून गावचा प्रमुख कारभार सांभाळणारे हे पद आतापावेतो पुरूषांची मक्तेदारीच समजली जायाची. मात्र महाराष्ट्र ग्राम अधिनियम १९६७ नुसार महिलांना आरक्षण मिळाले. त्यामुळे महाराष्टÑात पोलीस पाटीलपदी अनेक महिलांची नियुक्ती झाली. शासनाचे कान व डोळे समजल्या जाणाऱ्या या पोलीस पाटीलपदास महिलांच्या पुढाकाराने वेगळे स्थान व महत्त्व प्राप्त झाल. विंचूर गावासाठी हे पद महिलेसाठी आरक्षित होते. यासाठी गावातील दहा महिलांनी अर्ज दाखल केला होता. त्यातुनच भारती बोरसे यांची शासन प्रक्रियेद्वारे विंचुर गावच्या पोलीस पाटील नियुक्ति झाली.पती सुरेश व मुलगा प्रणव यांचेसहीत गावातील मान्यवर पदाधिकारी यांनीही कौतुक केले.पोलीस पाटीलपदाचा मान मिळाला तरी आपण कसलीही अभिलाषा न ठेवता मिळालेल्या पदाचा व सन्मानाचा लोकोपयोगी कामासाठी सदुपयोग करावा हे त्यांनी ठरविले. गावातील शिवार फेरीला सहपरिवार हजर राहून स्वत: टिकाव हातात घेत महिलांच्या सोबतीत आधी स्वत: शोषखड्डे खोदून श्रम दानाच महत्व समजून सागत आहे. त्यांच्या या पुढाकारास पतीचीही साथ मिळाली आहे. अंगणवाडी सेविका रत्ना पगारे व इतर महिला व विद्याथीर्नी सोबतीला आहेत.अर्थात पुरूष व ग्रामस्थ यांचाही सहभाग या कामात आहे. पानी फाऊंडेशनची जादुई कांडी गावात फिरावी व लोकसहभागातून पिण्याच्या व शेतीसाठीचा पाणीप्रश्न कायमचा सोडावा यासाठी अनेकजण पाणीदार कामगिरी करत आहेत.विंचूर गावात पाणी टंचाईविंचूरसहीत अनेक गावांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून विशेषत: उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली ती आपण सर्वांनी मिळून दूर केली तर यातुन इतरही समस्या आपोआप दुर होतील. पावसाळा कमी झाला तरी पाणी वापराचे नियोजन केले तरीही दुष्काळी परिस्थिती गावापासून दूरच राहते हे पानी फाऊंडेशन वॉटरकप स्पर्धेद्वारे होणाऱ्या प्रशिक्षणातून मला समजले असे त्यांनी सांगितले.पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शन..पानी फाऊंडेशनच्या महिलासाठीच्या बैठकीत गेले असता तेथील मार्गदर्शनाने त्या प्रभावित झाल्या. त्यांनी पाणी फाऊंडेशन वॉटरकप स्पर्धेचे चार दिवसीय निवासी प्रशिक्षण सार्वे येथे पूर्ण केले. पाणीदार गाव होण्यासाठी लोकांना जोडणारा खरा व सोपा पर्याय म्हणजेच वॉटरकप स्पर्धेत सहभागी होणे हे समजून घेत महिला व शाळेतील मुलांना एकत्र आणले.

टॅग्स :Dhuleधुळे