Vatsavitri Purnima celebrated by planting a tree | वडाचे झाड लावून साजरी केली वटसावित्री पौर्णिमा
dhule

कुसुंबा : वटपौर्णिमेचे औचित्य साधून धुळे येथील आधार नगरमध्ये जिजाऊ ब्रिगेड टिमने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.
वृक्षारोपणानंतर आयोजित कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वसुमती पाटील, आरोस्तोल पाटील, भारती पाटील, अर्चना पाटील, शितल पाटील, दिपाली पाटील, वैशाली ठाकरे, सुशिला देवरे, सीमा भदाणे, प्रतिभा सोनवणे, वंदना सुर्यवंशी, मोना चौधरी, निर्मला वाणी, उषाताई देसले, सुरेखा निकम, सुनिता बोरस, मीना पाटील, ज्योती पाटील यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व आधार नगर मधील महिला उपस्थित होत्या.


Web Title: Vatsavitri Purnima celebrated by planting a tree
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.