आॅनलाइन लोकमतधुळे : श्रीकालभैरव जयंतीनिमित्ताने १९ नोव्हेंबर रोजी खान्देश कुलस्वामिनी एकविरादेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.एकविरादेवी मंदिरात शमीच्या झाडाखाली पुरातन श्रीकालभैरव मंदिर आहे. कालभैरव जयंतीनिमित्ताने १९ रोजी सकाळी ८ वाजता पूजापाठ, अभिषेक होईल. तसेच स्वामीसमर्थ सेवा केंद्रातर्फे कालभैरव अष्टकाचे पठन करण्यात येईल. सकाळी ११ वाजता महानवैद्य अर्पण केल्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता हभप प्रल्हाद महाराज शास्त्री (सिन्नरकर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, मधुकर गुरव, मनोहर गुरव, चंद्रशेखर गुरव, शशिकांत चौधरी, पंकज ठाकूर, नंदलाल गुरव, संजय गुरव, शरद गुरव, भरत गुरव, दत्ता शिंदे, नीलेश नंदन, संजय गवळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
धुळ्यात कालभैरव जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:38 IST