शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:27 IST

 विविध घोषणांनी परिसर दणाणला, जिल्हा परिषद प्रशासनाला दिले निवेदन

ठळक मुद्देभर पावसात निघाला मोर्चामोर्चात शेकडो सेविका सहभागीशासनविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

आॅनलाइन लोकमतधुळे : अंगणवाडी कर्मचाºयांच्या भरतीवरील निर्बंध उठवावेत, अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्याचे एकत्रिकरण करण्यात येवू  नये, अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणेच वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे सोमवारी भर पावसात अंगणवाडी सेविकांचा  जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.कल्याण भवनापासून दुपारी मोर्चास सुरवात झाली. हा मोर्चा शिवतीर्थ, जुने जिल्हा रूग्णालयामार्गे जिल्हा परिषदेवर धडकला. मोर्चात शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या  प्रवेशद्वाराजवळ मोर्चा अडविण्यात आला. प्रवेशद्वाराजवळ सेविकांनी ठिय्या मांडला. या वेळी माया परमेश्वर, अ‍ॅड. गजानन तडे, युवराज बैसाणे, कृष्णा पाटील,  यांनी मार्गदर्शन केले.  अंगणवाडी कर्मचाºयांच्या भरतीवरील निर्बंध उठवावेत, अल्प उपस्थिीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करण्यात येवू नये. तसेच अंगणवाडी कर्मचाºयांची कपात करण्यात येवू नये, अंगणवाडी कर्मचाºयांना पूर्णवेळ काम देवून, शासकीय/निमशासकीय कर्मचाºयांचा दर्जा लागू करावा,अंगणवाडी कर्मचाºयांना मिळणाºया सेवासमाप्ती लाभामध्ये सुधारणा करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाºयां दिल्या जाणाºया भाऊबीज भेटीच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी,अंगणवाडी कर्मचाºयांना दरवर्षी मानधनात २० टक्के मानधन वाढ करण्यात यावी.अंगणवाडीसेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा साडेदहा हजार तसेच मदतनीसांना ८ हजार रूपये मानधन लागू करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निधनानंतर अनुकंपातत्वावर वारसदारांना समावून घ्यावे.अंगणवाडी केंद्रस्तरावर मिळणारा परिवर्तनीय निधी एक हजार ऐवजी पाच हजार करावा. गणवेशाच्या रकमेत ६०० रूपये ऐवजी १ हजार रूपये करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.या  मोर्चात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. 

टॅग्स :Dhuleधुळे